(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Licypriya Kangujam: मणिपूरच्या पर्यावरण ॲक्टिविस्टला सपा नेत्यानं म्हटलं विदेशी! नेटकऱ्यांनी चांगलंच फटकारलं
Licypriya Kangujam: मणिपूरच्या 10 वर्षाच्या पर्यावरण एक्टिविस्ट लिसिप्रिया कंजुगम यांनी ट्विटरवर यमुनेच्या काठावर ताजमहालच्या मागे साठलेला प्लास्टिकचा कचरा दाखविणारा एक फोटो शेअर केला.
Licypriya Kangujam: मणिपूरच्या 10 वर्षाच्या पर्यावरण ॲक्टिविस्ट लिसिप्रिया कंजुगम यांनी ट्विटरवर यमुना नदीच्या काठावर ताजमहालच्या मागे साठलेला प्लास्टिकचा कचरा दाखविणारा एक फोटो शेअर केला. त्यानंतर सपा (Samajwadi Party) नेते मनीष अग्रवालनं (Manish Jagan Agrawal) भाजपवर निशाणा साधला. परंतु, यादरम्यान, लिसिप्रियाला ओळखण्यात त्यांच्याकडून मोठी चूक झाली. भाजपला टोला लगावत असताना मनीष अग्रवालनं लिसिप्रिया कंजुगमला विदेशी म्हटलं. विदेशी असल्याचा दावा करणाऱ्या मनीष अग्रवालला लिसिप्रियानं सडेतोड उत्तर दिलंय. त्यानंतर नेटकऱ्यांनीही मनीष अग्रवालला चांगलंच ट्रोल केलं.
मनीष अग्रवालनं काय म्हटलंय?
लिसिप्रिया 20 जून रोजी पहिल्यांदा आग्रा येथे आली होती. ताजमहाल पाहिल्यानंतर ती यमुनेच्या काठावर गेली. जिथे तिला प्लास्टिकचा कचरा साठलेला आढळला. ज्याचे फोटो तिनं 21 जून रोजी ट्विटरवर पोस्ट केले होते. हेच फोटो शेअर करत सपा नेते मनीष अग्रवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं की, "विदेशी पर्यटक भाजप शासित योगी सरकारला आरसा दाखवण्यासाठी मजबूर झाले. भाजपच्या सरकारमध्ये यमुना प्रदुषित झाली. ही अस्वच्छता ताजमहालच्या सौंदर्यावर डाग आहे, विदेशी पर्यटकांनं सरकारला आरसा दाखवणं अत्यंत लज्जास्पद आहे. योगी सरकारनं भारत आणि उत्तर प्रदेशची अशी प्रतिमा तयार केलीय", असं मनीष अग्रवालनं म्हटलंय.
Hello Sir,
— Licypriya Kangujam (@LicypriyaK) June 22, 2022
I'm a proud Indian. I'm not a foreigner. 🙏 https://t.co/KBshDFJzQM
लिसिप्रियाचं मनीष अग्रवालला सडेतोड उत्तर
लिसिप्रिया ही मणिपूरची रहिवासी आहे. मात्र, मनीष अग्रवालनं तिला आपल्या ट्वीटमध्ये तिला परदेशी नागरिक असल्याचं म्हटलं. त्यानंतर लिसिप्रियानं "मला भारताचा अभिमान आहे, मी परदेशी नाही" असं मनीष अग्रवालच्या ट्वीटला रिट्वीट करत त्यांना सडेतोड उत्तर दिलंय.
लिसिप्रियाला 20 पेक्षा अधिक पुरस्कार
वयाच्या सहाव्या वर्षापासून पर्यावरण रक्षणासाठी चळवळ चालवणाऱ्या लिसिप्रियाला 2019 मध्ये स्पेनमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. याशिवाय तिनं 32 देशांतील 400 संस्थांना भेटी दिल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यानं दर आठवड्याला दहा झाडे लावण्याची मोहीम मी राबवत असल्याचं तिनं म्हटलंय. या मोहिमेअतंर्गत सुमारे 3.50 लाख झाडे लावण्यात आली. तिला 2019 मध्ये जागतिक चिल्ड्रन्स पीस प्राइज, राइजिंग स्टार ऑफ अर्थ डे, 2020 मध्ये ग्लोबल चाइल्ड प्रॉडिजी अवॉर्ड, वॉटर हिरो असं 20 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालंय.
हे देखील वाचा-
- Agnipath Scheme : अग्निपथ योजनेला विरोध होत असताना वायुसेनेत भरती प्रक्रियेला सुरुवात, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
- Operation All Out : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कामगिरी, या वर्षात 118 दहशतवाद्यांचा खात्मा
- Ram Mandir : जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण! राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम सरपंचाने दिली 25 लाखांची देणगी