एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकच्या महिलेने भोंदूबाबाला इंगा दाखवला, कन्झ्युमर कोर्टात खेचून नुकसान भरपाई मिळवली

Nashik News : भूतबाधा, जादूटोणा, आजार दूर करण्याची ऑनलाइन जाहिरात करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका भोंदूबाबाला दंड ठोठावलाय.

Nashik News : भूतबाधा, जादूटोणा, आजार दूर करण्याची ऑनलाइन जाहिरात करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका भोंदूबाबाला दंड ठोठावला असून महिलेनं पूजा विधीसाठी भरलेले पैसेही परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बुवाबाजी करणाऱ्या विरोधात पहिल्यांदाच असा निकाल दिल्याने या निकालाला महत्व प्राप्त झाले असून अंनिसच्या लढ्याला बळ मिळाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या एका महिलेला सोशल मिडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका बाबाची जाहिरात बघायला मिळाली. भूत बाधा, काळी जादू, जादूटोणा आणि कुटुंबातील सर्वांची आजारापासून एक दिवसात होम हवनच्या माध्यमातून सुटका करतो, असा दावा करण्यात आला होता. ही जाहिरात बघून महिलेने 2 लाख 51 हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून भोंदूबाबाच्या खात्यावर पाठवले आणि बाबाच्या सांगण्यावरून ऑनलाइन पूजा केली. मात्र, सांगितलेले विधी करूनही काहीच फरक पडला नसल्यानं महिलेने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच मानसिक आणि शाररिक त्रास झाल्याचा खटला दाखल करत व्याजासह 50 कोटी रुपयांची मागणी केली होती. 

भोंदूबाबाला ठोठावला दंड 

यावर सुनावणी देताना ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 50 हजार रुपयांचा दंड, शारीरिक आणि मानसिक त्रासपोटी 15 हजार, तक्रार अर्जासाठी आलेल्या खर्चाचे 7 हजार असे आणि बाबाच्या बँक खात्यात भरण्यात आलेल्या 2 लाख 51 हजार रुपयांची रक्कम महिलेला देण्याचे आदेश दिले आहेत. कानपूर मधील संतोष सिंग भरोदियायाच्या विरोधात निकाल देण्यात आला असून करोली बाबा या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या भोंदूबाबा विरोधात जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

कोण आहे करौली बाबा उर्फ संतोषसिंग भदोरिया ?

उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ असलेल्या करौली या गावात या महाराजाचा आश्रम आहे. 14 एकरात हा अनधिकृत आश्रम स्थित आहे. तथाकथित तंत्रमंत्र, जादुटोणा करण्यासाठी हा भोंदुबाबा कुप्रसिद्ध आहे. अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहे. शेतकरी नेता अशी ख्याती मिळाल्याने त्याने अनेक जमिनी हडप करुन नावावर केल्याचेही समजते. करौली येथील हा असाच जमीन बळकावून आश्रम तयार केला आहे. कॅन्सरसारखे आजार बरे करण्याचा दावा तो करतोय. विरोध करणाऱ्यांना तो हाणामारी करतो. युट्युबवर देखील हा बाबा प्रसिध्द आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime : नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांकSpecial Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोधSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Embed widget