मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
दहा दिवसांच्या आत ठोस कारवाई झाली नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता .या भेटीनंतर महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासासाठीचा दबाव वाढला .

Beed: परळी तहसील कार्यालयासमोर भर रस्त्यात खून झाल्यानंतर आता 15 महिने उलटून गेले तरी आरोपी मोकाट आहे .न्यायासाठी आता किती दिवस वाट बघायची ?असे म्हणत महादेव मुंडे (Mahdev Munde) यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमरण उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Konvat) यांनी महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे . ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीयांनी या प्रकरणावरून पोलीस अधीक्षक नवनीत कवती यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय . महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास तातडीने एसआयटी किंवा सीआयडी कडे देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली होती .
महादेव मुंडेंच्या तपासासाठी पथकाची नेमणूक
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथक स्थापन केले असून या पत्रकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल चा समावेश असणार आहे .एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे .महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांच्या घेतलेल्या भेटीनंतर या तपासाच्या तपासासाठी पाचसदस्यांचे एक पथक नेमण्यात आले आहे .
महादेव मुंडेंच्या तपासासाठी दबाव वाढला
एकीकडे परळीमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 60 दिवसांहून अधिक काळ लोटला आहे .तरीही या प्रकरणात एक आरोपी अद्याप फरारच आहे .पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप होत असून पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे .दरम्यान दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्येला 15 महिने उलटून गेले तरी तपास यंत्रणा हलत नसल्याचा संताप मुंडे कुटुंबीयांकडून व्यक्त होतोय .या संदर्भातच मुंडे कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत 11 फेब्रुवारीला पोलीस अधीक्षकांचे भेट घेतली होती .दहा दिवसांच्या आत ठोस कारवाई झाली नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता .या भेटीनंतर महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासासाठीचा दबाव वाढला . अंजली दमानियांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही या प्रकरणाच्या तपासावरून सवाल उपस्थित केल्यानंतर आता 5 सदस्यांच्या तपास पथकाची नेमणूक बीड Sp नवनीत काँवत यांनी केली.
हेही वाचा:
Suresh Dhas: धनंजय मुंडेंच्या मागे हात धुऊन लागलेल्या सुरेश धसांना अजित पवारांनी भेट नाकारली?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
