एक्स्प्लोर

Morning Headlines 16th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

IAF LCA Fighter Jet : स्वदेशी LCA मार्क 1A लढाऊ विमानाची ताकद आणखी वाढणार, 'उत्तम' आणि 'अंगद'मुळे वायुसेनेला मिळणार बळ

IAF LCA Mark 1A Fighter Jet : आता भारताचं लष्करी सामर्थ्य आणखी वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मार्क 1A लढाऊ विमानांमध्ये (Mark 1A Fighter Jets) नवीन विकसित प्रणाली सामील करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या LCA मार्क 1A लढाऊ विमानामध्ये (Light Combat Aircraft) 'उत्तम' आणि 'अंगद' या दोन नवीन प्रणाली समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय बनावटीचं हलक्या वजनाचं लढाऊ विमान अधिक सुसज्ज यंत्रणांनी शत्रूला सामोरं जाण्यास सज्ज असेल. वाचा सविस्तर 

Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या दरांत वाढ, देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले?

Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil Prices) पुन्हा एकदा थोडीशी वाढ झाली आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या दरांमधील चढ-उताराचा परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या स्तरावर दिसून येत नाही. आजच्या ताज्या अपडेटनुसार म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. अशातच, राज्य स्तरावर लागू केलेल्या करांमुळे, विविध राज्यांतील शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमतींमध्ये किरकोळ बदल दिसून येतात. जाणून घेऊया आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत, वाचा सविस्तर... 

Weather Update : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, कोकण किनारपट्टीसह कर्नाटकमध्ये मेघगर्जनेसह पाऊस; 'या' राज्यांमध्येही वरुणराजा बरसणार

Weather Update Today : महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशातील अनेक राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी, अनेक राज्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. याशिवाय येत्या 24 तासांतही राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, कोकण किनारपट्टीसह कर्नाटकमध्ये आज विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

हमासला संपवून टाकू, जो बायडन यांचा स्पष्ट इशारा, तर गाझावर कब्जा करु नका; इस्रायललाही दिलाय सल्ला

US President Joe Biden on Israel Hamas War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी हमासला (Hamas) इशारा दिला आहे. हमासला संपवून टाकू, असं म्हणत राष्ट्राध्यक्ष बायडन कडाडले आहेत. तर गाझावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न इस्रायलनं अजिबात करु नये, असा सल्लाही अमिरेकेनं इस्रायलला दिला आहे. एवढंच नाहीतर इस्त्रालय हमास वादात ढवळाढवळ करणाऱ्या इराणलाही अमेरिकेनं स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. वाचा सविस्तर 

तुमचं नशीब बदलवू शकते SIP; 5 हजार, 8 हजार, 10 हजार रुपये दरमाहा गुंतवा अन् कोट्यधीश व्हा!

SIP Calculator : प्रत्येकजण लक्षाधीश होण्याचं स्वप्न पाहतो, परंतु काही मोजकेच ते साध्य करू शकतात. तुम्हीही मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल, नोकरी करत असाल आणि भविष्यात तुम्हाला कोट्यधीश बनायचं असेल तर हे स्वप्न SIP च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीद्वारे (SIP Calculator Updates) करावी लागते. SIP हे मार्केट लिंक्ड असलं तरी, बहुतेक तज्ज्ञ हे आजच्या काळात गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय असल्याचं सांगतात. वाचा सविस्तर 

World Anaesthesia Day 2023 : ऍनेस्थेसिया म्हणजे काय? ऍनेस्थेसियाचे प्रकार कोणते? जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

World Anaesthesia Day 2023 : आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी ऍनेस्थेसिया हा शब्द ऐकला किंवा वाचला असेल. ही एक प्रकारची वैद्यकीय प्रक्रिया आहे, जी सामान्यतः डॉक्टरांद्वारे शस्त्रक्रिया इत्यादीसाठी वापरली जाते. वैद्यकीय आरोग्य सेवेमध्ये भूल देण्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 'जागतिक भूल दिन' साजरा केला जातो. हा दिवस ऍनेस्थेटिस्ट, ज्यांना ऍनेस्थेसियोलॉजिस्ट म्हणूनही ओळखले जाते, जे रुग्णांना वेदना न होता शस्त्रक्रिया करण्यास मदत करतात, त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. या निमित्ताने ऍनेस्थेसिया म्हणजे काय आणि ते का वापरले जाते याबद्दल जाणून घेऊयात. वाचा सविस्तर 

16 October In History : बंगालच्या फाळणीला सुरूवात अन् देशभरात असंतोष, पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या; आज इतिहासात

16th October In History : आजचा दिवस हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. फोडा आणि राज्य करा या तत्वानुसार ब्रिटिशांनी भारतात हिंदू आणि मुस्लिमांच्या एकतेला तडा देण्याची रणनीती आखली आणि बंगालच्या फाळणीचा घोषणा केली. आजच्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालच्या फाळणीची सुरूवात झाली. तसेच बॉलिवूडसाठीही आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी ड्रीम गर्ल हेमा मालिनीचा जन्म झाला. वाचा सविस्तर 

Horoscope Today 16 October 2023 : मिथुन, कन्या, मीन राशीचं भाग्य उजळणार; इतर राशींचा आजचा दिवस कसा जाईल? राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Monday 16 October 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज 16 ऑक्टोबर 2023 चा दिवस महत्त्वाचा आहे. वृषभ राशीच्या लोकांनी आज सोमवारी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मिथुन, कन्या, मीन राशीच्या लोकांनी अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या साथीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व 12 राशीच्या लोकांचा सोमवारचा दिवस कसा राहील? आजचं राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania PC : इफ्कोमध्ये महाघोटाळा, धनंजय मुंडेंवर मोठे आरोप; अंजली दमानियांनी स्फोटक PCABP Majha Headlines : 05 PM : 19 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde on Rahul Gandhi : शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्रासह देशाचा अपमानMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
लाडकी बहीण योजनेला शासनाचं आणखी बळ मिळणार; नवसंकल्पनेतून महिलांना कुठला लाभ मिळणार?
लाडकी बहीण योजनेला शासनाचं आणखी बळ मिळणार; नवसंकल्पनेतून महिलांना कुठला लाभ मिळणार?
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'; शिंदेंच्या आमदाराचं CM फडणवीसांना पत्र
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'; शिंदेंच्या आमदाराचं CM फडणवीसांना पत्र
Football Match In Kerela : फुटबॉल फायनल सुरु असताानाच फटाक्यांचा आतषबाजीने मैदानात भडका, 50 जण भाजले; फुटबॉल पंढरी हादरली
Video : फुटबॉल फायनल सुरु असताानाच फटाक्यांचा आतषबाजीने मैदानात भडका, 50 जण भाजले; फुटबॉल पंढरी हादरली
ज्वारीच्या कडक भाकरीवर छत्रपती शिवराय; महाराजांची अफलातून कलाकृती, पाहा फोटो...
ज्वारीच्या कडक भाकरीवर छत्रपती शिवराय; महाराजांची अफलातून कलाकृती, पाहा फोटो...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.