एक्स्प्लोर

IAF LCA Fighter Jet : स्वदेशी LCA मार्क 1A लढाऊ विमानाची ताकद आणखी वाढणार, 'उत्तम' आणि 'अंगद'मुळे वायुसेनेला मिळणार बळ

LCA-Light Combat Aircraft : स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट मार्क 1A लढाऊ विमानामध्ये 'उत्तम' रडार (Uttam Radar) आणि 'अंगद' (Angad) इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर संच हे विकसित तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

IAF LCA Mark 1A Fighter Jet : आता भारताचं लष्करी सामर्थ्य आणखी वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मार्क 1A लढाऊ विमानांमध्ये (Mark 1A Fighter Jets) नवीन विकसित प्रणाली सामील करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या LCA मार्क 1A लढाऊ विमानामध्ये (Light Combat Aircraft) 'उत्तम' आणि 'अंगद' या दोन नवीन प्रणाली समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय बनावटीचं हलक्या वजनाचं लढाऊ विमान अधिक सुसज्ज यंत्रणांनी शत्रूला सामोरं जाण्यास सज्ज असेल. 

स्वदेशी LCA मार्क 1A लढाऊ विमान यंत्रणांनी सुसज्ज

स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मार्क 1A लढाऊ विमानामध्ये (Mark 1A Fighter Jets) 'उत्तम' रडार (Uttam Radar) आणि 'अंगद' (Angad) इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर संच (Electronic Warfare Suite) हे विकसित तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. उत्तम अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर संच या प्रणाली सध्या विकासित टप्प्यात आहेत. या प्रणाली लवकरच LCA मार्क 1A लढाऊ विमानांमध्ये सामील केल्या जातील, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

'उत्तम' आणि 'अंगद' वाढणार ताकद 

केंद्र सरकार लष्करी सामर्थ्य वाढवण्यासोबतच त्यामध्ये स्वदेशीकरणाच्या दिशेनेही वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दृष्टीने लष्करात स्वदेशी बनावटीची विमाने आणि क्षेपणास्र सामील करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. भारतीय वायुसेना (IAF) 'मेड इन इंडिया' (Made in India) लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मार्क 1A लढाऊ विमानांमध्ये 'उत्तम' रडार आणि 'अंगद' इलेक्ट्रॉनिक युद्ध संच प्रणालीने सुसज्ज आहे. भारतीय हवाई दल (IAF) मध्ये आधीच 83 LCA मार्क 1A लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यात आणखी 97 LCA फायटर जेट हवाई दलात सामील करण्याची योजना आहे. 

स्वदेशी विकसित प्रणाली वाढवणार सामर्थ्य

लष्करी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात तयार करण्यात आलेल्या 'मार्क 1 ए' या हलक्या लढाऊ विमानात प्रथम 'उत्तम' रडार आणि 'अंगद' इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट बसवण्यात येणार आहे. उत्तम अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले अॅरे रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट स्वदेशी पद्धतीने विकसित केले जात असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतीय वायू दलात 180 LCA विमाने

भारतीय हवाई दलाने 83 'LCA मार्क-1A' साठी करार केला होता. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वायू दलात आणखी 97 विमाने सामील होणार आहेत. त्यानंतर, भारतीय वायूसेनेतील LCA मार्क-1A' विमानांची संख्या 180 असेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Embed widget