एक्स्प्लोर

Horoscope Today 16 October 2023 : मिथुन, कन्या, मीन राशीचं भाग्य उजळणार; इतर राशींचा आजचा दिवस कसा जाईल? राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 16 October 2023 : शारदीय नवरात्रोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या माळेच्या दिवशी 12 राशींचं राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Monday 16 October 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज 16 ऑक्टोबर 2023 चा दिवस महत्त्वाचा आहे. वृषभ राशीच्या लोकांनी आज सोमवारी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मिथुन, कन्या, मीन राशीच्या लोकांनी अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या साथीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व 12 राशीच्या लोकांचा सोमवारचा दिवस कसा राहील? आजचं राशीभविष्य जाणून घ्या.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. कोणत्याही विषयावर निर्णय घ्यायचा असेल तर आज कोणाचाही सल्ला घेणे टाळा. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुमचा व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न कराल, तुमच्या व्यवसायातील प्रगतीमुळे मार्केटमध्ये तुम्हाला खूप मान मिळेल. विवाहितांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. तुम्ही तुमच्या साथीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा बेत आखू शकता. कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे. तरुणांसाठी यशाच्या संधी उघडू शकतात. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, पोट किंवा फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, ते तुम्ही साध्य कराल, फक्त मेहनत करत राहा. कुटुंबीयांसोबत खेळीमेळीचं वातावरण असेल, यामुळे तुमच्या घरात शांततेचे वातावरण राहील आणि तुमचे मनही खूप आनंदी असेल. तुमच्या प्रियकरासह कुठेतरी बाहेर जाऊ शकता आणि तुमच्या भावना जोडीदारासमोर व्यक्त करू शकता. आज तुमचे आरोग्य उत्तम राहील,  कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. पण आज जास्त पैसे खर्च करू शकता. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप चांगला असेल. राजकारणात वावरणाऱ्या लोकांना मोठी जबाबदारी किंवा मोठे पद मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर आज तुम्हाला व्यवसायात खूप फायदा होईल. लहान व्यावसायिकांनाही मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला व्यवसायात मोठी गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस उत्तम आहे, यातून तुम्हाला नक्की नफा मिळेल. नोकरदारांसाठीही दिवस चांगला राहील, प्रगती होऊ शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मालमत्ता किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही चढ-उतार दिसतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही प्रकारच्या भांडणात पडू नये. शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर थोडा विचार करून पैसे गुंतवा. तुमचे नुकसान देखील होऊ शकते. उद्या जर कोणी तुम्हाला पैसे उधार देण्यास सांगितले तर तुम्ही कोणाला पैसे देऊ नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमचे पैसे परत करण्यात खूप त्रास देऊ शकते.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. तुम्हाला बढती मिळू शकते किंवा पगारात वाढ होऊ शकते. यामुळे तुमची उर्जा पातळी वेगळी असेल. भागीदारी व्यवसाय करत असाल तर व्यवहार करताना काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या वाढू शकतात. तरुणाई मित्रांसोबत जास्त वेळ घालवेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस  समस्या आणि आनंद दोन्ही आणू शकतो. तुमच्या वाणीने आणि स्वभावाने लोकांची मने जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय किंवा करिअरमधील जोखीम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या आठवडय़ात तुम्ही धार्मिक राहाल, उपासनेत अधिक रस घ्याल. वैवाहिक जीवन चांगले जाईल.

तूळ

तूळ राशीचे लोक आजच्या दिवशी जे काही काम करण्याचा विचार करतील, ते काम नक्कीच पूर्ण होतील. काही प्रलंबित सरकारी कामे पूर्ण झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या गुरूंप्रती श्रद्धा आणि निष्ठा असेल तर त्यांना आज लाभ मिळेल. व्यवसायात आज तुम्हाला नवीन माध्यमातून आर्थिक लाभ मिळेल. जर तुम्हाला नवीन मालमत्ता खरेदी करायची असेल, तर त्याची बाजू स्वतंत्रपणे तपासा. संध्याकाळी देवाच्या दर्शनासाठी तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत तीर्थयात्रेला जाऊ शकता.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनो, आज व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अन्यथा तुमच्यासाठी तोट्याचा व्यवहार होऊ शकतो. पालक आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेत राहू शकतात आणि काही ठोस निर्णय देखील घेऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत काही तणावपूर्ण गोष्टी घडू शकतात आणि तो तुमच्यावर रागावू शकतो. नोकरदार लोकांच्या नोकरीत बदलाच्या योजना यशस्वी होतील. संध्याकाळी शत्रूशी वाद झाला तर धीर धरावा लागेल.

धनु

धनु राशीचे लोक आज खरेदीवर पैसे खर्च करतील. धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. एखाद्या नातेवाईकासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. छोट्या व्यावसायिकांना आज पैशांचा तुटवडा जाणवू शकतो. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आदर मिळेल आणि मदत करण्यासही तयार राहाल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तसेच ज्ञानात वाढ होईल. तुम्हाला संध्याकाळी बाहेरचे खाणे-पिणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्हाला पोटदुखी, गॅस, अपचन इत्यादी पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मकर

मकर राशीचे लोक आज कुटुंबाच्या मदतीने घरातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. लव्ह लाइफमधील लोक आज आपल्या जोडीदारासोबत जेवायला जाण्याचा विचार करतील. सामाजिक कार्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. आज बोलण्यात गोडवा आणा, नाहीतर केलेले काम बिघडू शकते आणि नात्यात कडवटपणा येऊ शकतो. मुलांसोबत खरेदीसाठी वेळ काढाल. संध्याकाळी मित्रांसोबतच्या संभाषणात तुम्हाला नवीन माहिती मिळेल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमचे काही काम पूर्ण होऊ शकते, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. तुमच्या जोडीदारासोबत काही नाराजी सुरू असेल तर तीही आज दूर होईल. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील, त्यामुळे तुम्हाला तुमची मिळकत आणि खर्च यात समतोल राखावा लागेल, अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. संध्याकाळचा वेळ घरातील लहान मुलांसोबत घालवायला आवडेल.

मीन

मीन राशीच्या लोकांना आज आपल्या जोडीदाराची प्रगती पाहून आनंद होईल. जर नोकरदार लोक दुसरी नोकरी शोधत असतील तर ती काही काळ पुढे ढकलून तुम्ही जिथे काम करत आहात तिथेच राहा. जवळच्या व्यक्तीसोबत व्यवहार करण्याची संधी मिळेल, परंतु तुम्हाला ते टाळावे लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. रविवार असल्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र असेल, मित्रांकडून गुंतवणुकीसंबंधी नवीन माहिती मिळेल. संध्याकाळी कुटुंबीयांसह तीर्थस्थळी जाण्याचा बेत होईल

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Nag Panchami 2026: नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
Horoscope Today 17 August 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 August 2026: आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget