Meghalaya Earthquake : मणिपूरनंतर आता मेघालय हादरलं, 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
Meghalaya Earthquake Updates : मणिपूरनंतर आता मेघालय हादरलं असून तेथे 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
Meghalaya Earthquake : मणिपूरनंतर (Manipur) आता मेघालय हादरलं आहे. मेघालयमध्ये (Meghalaya) 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल आहे. मेघालयमध्ये मंगळवारी (28 फेब्रुवारी) सकाळी 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये पहाटे 2:46 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 25 किमी खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी मोजली गेली आहे. ईशान्य भारतात गेल्या दहा दिवसांमधील भूकंपाची ही चौथी घटना आहे.
Earthquake of Magnitude:3.2, Occurred on 28-02-2023, 02:46:39 IST, Lat: 24.67 & Long: 93.66, Depth: 25 Km ,Location: Noney, Manipur, India for more information Download the BhooKamp App https://t.co/JylnXpZjDx@Indiametdept @ndmaindia @Dr_Mishra1966 @Ravi_MoES @OfficeOfDrJS pic.twitter.com/dwcWuqwXdk
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 27, 2023
मणिपूरनंतर आता मेघालय हादरलं
मणिपूरनंतर आता भारताच्या ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS - National Centre for Seismology) ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात 3.7 तीव्रतेचा भूकंप झाला. पहाटे 2.46 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. NCS ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. NCS ने दिलेल्या माहितीनुसार, मेघालयातील तुरा येथे सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.
ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरुच
भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरुच आहे. मेघालयामध्ये 16 फेब्रुवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अहवालानुसार सकाळी 9.26 वाजता मणिपूरमध्ये भूकंप झाला आणि त्याचा केंद्रबिंदू पूर्व खासी हिल्समध्ये 46 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती समोर आली.
आसाममधील शिलाँगसह इतर भागात भूकंपाचे धक्के
याशिवाय शिलाँग, पूर्व खासी हिल्स जिल्हा मुख्यालय, री- भोई आणि आसामच्या कामरूप महानगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :