एक्स्प्लोर

Ind vs NZ: बॅटिंगचे हाल, ०-३ निकाल

India vs New Zealand: आधी बंगळुरु, मग पुणे आणि आता मुंबई. तिन्ही कसोटीत किवी टीमने भारतीय संघाला पाणी पाजलं. हे वाक्य लिहितानाही बोटं थरथरतायत, मनाला यातना होतायत. आपल्या भूमीवर येऊन आपल्याला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची गेल्या १२ वर्षांमध्ये कुणाची हिंमत झाली नव्हती. इथे मात्र लॅथमच्या न्यूझीलंड टीमने आपल्याला चारी मुंड्या चीत केलं. रोहित, विराटसारखे अनुभवी आणि गिल, जैस्वाल, सर्फराजसारखे प्रतिभावान युवा फलंदाज संघात असताना आपली बॅटिंग पुन्हा पुन्हा कोसळत राहिली. बंगळुरुच्या दुसऱ्या डावाचा अपवाद वगळता आपल्या विकेट्स इतक्या वेगाने जात होत्या की, मॅच पाहतोय की हायलाईट्स तेच कळत नव्हतं. ऐन दिवाळीत आपल्या बॅटिंगचं दिवाळं निघालं. फिरकीला पोषक खेळपट्टीवर वाढलेल्या आपल्या फलंदाजांकडे किवींच्या फिरकीवर मात्र उत्तर नव्हतं. दुसऱ्या कसोटीत आपल्या २० पैकी १८ तर तिसऱ्या कसोटीत आपल्या २० पैकी १६ विकेट्स त्यांच्या स्पिनर्सनी टिपल्या.

आपल्याच मैदानात खेळताना किवींनी आपली दाणादाण उडवली. फलंदाजांनी विकेट इतकी स्वस्त केल्या की, जणू किवी गोलंदाजांसाठी दिवाळी ऑफरच. ४६, ४६२, १५६, २४५, २६३, १२१ ही सहा डावांमधली संघाच्या धावांची आकडेवारीच सारं काही सांगून जाणारी आहे. बंगळुरुच्या दुसऱ्या डावाचा अपवाद वगळता इतर पाचही डावात आपण तीनशे पारही जाऊ शकलो नाही. यात एकदा पन्नाशी तर दोनदा शंभरच्या पटीतच आपण गडगडलो. मैदान कसोटीचं असताना आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर टिकावच धरु शकले नाहीत. बंगळुरु कसोटीत पावसानंतरच्या खेळपट्टीवर आपलं टॉस जिंकून पहिल्या फलंदाजीला उतरलो आणि घात झाला. आपलं ४६ वरच पॅकअप झालं ते ३१.२ ओव्हर्समध्ये. तर, पुण्यात ४५.३ आणि ६०.२ षटकं आपण तग धरु शकलो.  मुंबई कसोटीत आपण ५९.४ आणि २९.१ ओव्हर्स फलंदाजी केली. आपल्याच अंगणात येऊन सँटनर, पटेल आणि फिलिप्स या फिरकी त्रयीने त्रेधातिरपीट उडवली. त्यात संघातील सर्वात अनुभवी दोन फलंदाजांची आकडेवारीही पुरेशी बोलकी आहे. कोहली ०,७०,१,१७,४,१ अशा सहा डावात ९३ धावा. तर, रोहित शर्मा २,५२, ०,८,१८,११ अशा सहा डावात मिळून ९१ धावा. ज्या दोन मोठ्या फटाक्यांच्या आवाजाने आपण प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवायचो. त्यांचाच आवाज दाबला गेला. इतकी वर्षे हे दोघे क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये आपल्यासाठी धावांचा पाऊस पाडत होते. या मालिकेत मात्र दोघांच्याही बॅटने जणू संप पुकारला. धावा आटल्या, धावफलकाला कोरड पडली, घसा सुकला आणि विजय हुकला. या मालिकेत जैस्वाल, गिल, सर्फराज खानसारखे प्रतिभावान युवा पण कसोटीतील अननुभवी फलंदाज घेऊन आपण उतरलो होतो.

एखाद-दुसरी इनिंग वगळता या यंग ब्रिगेडला मोठी इनिंग करता आली नाही. गिलने सहापैकी एका इनिंगमध्ये ९० तर उरलेल्या पाचपैकी तीन डावात ३९,३०,२३ असा स्कोअऱ नोंदवला. म्हणजेच जम बसल्यावर तो तीनदा बाद झालाय. तर सर्फराज खानच्या खात्यात ०,१५०, ११,९,०,१ या धावा जमा राहिल्या. तिकडे जैस्वालच्या बाबतीतही चांगली सुरुवात होऊन त्याला तो स्टार्ट मोठ्या इनिंगमध्ये कनव्हर्ट करता आला नाही. त्याचे सहा डावातले स्कोअर्स पाहा - १३,३५,३०,७७,३०,५ म्हणजे सहापैकी चार वेळा सेट झाल्यावर तो आऊट झालाय. वनडे, टी-ट्वेन्टीचा अतिरेक होतोय, असा एक सूर नेहमी ऐकायला मिळतो. म्हणजे पाहा ना, बंगळुरुची पहिली कसोटी पहिला दिवस पावसात जाऊन चार दिवसात निकाली ठरली. तर, पुणे आणि मुंबईत तीन दिवसांतच खेळ संपला. खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहणारे सचिन, द्रविड, लक्ष्मण, पुजारा, रहाणे यांच्या अनेक इनिंग यामुळे डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.

एक योगायोग पाहा, याच न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या देशात खेळताना २००९ च्या नेपियर कसोटीत भारतावर फॉलोऑनची नामुष्की आली होती. तेव्हा दुसऱ्या डावात भारताने चिवट फलंदाजी करत मॅच ड्रॉ केली होती. ज्यात मुख्य भूमिकेत होता त्यावेळचा सलामीवीर आणि आताच्या टीमचा कोच गौतम गंभीर. त्याने ६४३ मिनिटे म्हणजे जवळपास १० तासांहून अधिक काळ किल्ला लढवलेला. ४३६ चेंडूंमधील त्याच्या १३७ च्या इनिंगने सामना वाचवण्यात मोठी भूमिका बजावलेली. तेव्हा आपण दुसऱ्या डावात चार बाद ४७६ धावा करताना तब्बल १८८ ओव्हर्स बॅटिंग केली होती. तर, विद्यमान मालिकेत चार डावांमध्ये मिळून आपण साधारण १९० च्या आसपास ओव्हर्स बॅटिंग केलीय. एक गोष्ट मान्य की, तो काळ २००९ चा होता, आज आपण २०२४ मध्ये आहोत. काळाच्या ओघात टी-ट्वेन्टी, वनडेचा भाव वधारला. आक्रमक फटके खेळणं वाढल्याने कसोटी सामना निकाली ठरण्याची टक्केवारी वाढली. असं असलं तरीही कसोटी क्रिकेटचं मूळ सूत्र कायमच राहायला हवं. खेळपट्टीवर पाय रोवून उभं ठाकणं हे आपण विसरलोय का? दोन, तीन चेंडू फटका मारायला मिळाला नाही फलंदाजांमधले पेशन्स संपायला लागलेत का? हे प्रश्न आपण स्वत:ला विचारून पाहायला हवेत.

या मालिकेतील आणखी एक अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे आपल्या फिरकी गोलंदाजीसमोर स्वीप तसंच रीव्हर्स स्वीपच्या फटक्याचा किवींनी केलेला प्रभावी वापर. या रणनीतीमुळे आपल्या फिरकी गोलंदाजांची लाईन-लेंथ डिस्टर्ब करण्यात ते बऱ्यापैकी सफल झाले. आपल्या मुख्य अस्त्राची धार त्यांनी कमी केली. त्यात भर म्हणजे टॉसचं दान दोनदा किवींच्या पारड्यात गेल्याने दोनवेळा चौथ्या डावात आपल्याला फलंदाजी करावी लागली. हे कितीही खरं असलं तरी न्यूझीलंडने आपल्यावर वर्चस्व गाजवलं हे मान्य करावं लागेल. असो, झालं गेलं. मागे पडलं. आता आपल्याला या धक्क्यातून सावरायला वेळ कमी आहे. अवघ्या १९ दिवसांनी आपल्याला कांगारुंच्या भूमीत पहिली कसोटी खेळायचीय तीही पर्थच्या मैदानात. छाताडापर्यंत उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या, कमिन्स आणि कंपनी आपली वाट पाहतायत. गेल्या दोन दौऱ्यातील कसोटी मालिकांमध्ये आपण त्यांच्याच भूमीत त्यांचं नाक ठेचून आलोय. त्यामुळे त्यांचेही हात परतफेड करायला शिवशिवत असणार. त्यात आपल्या मायदेशातील पराभवाच्या या मालिकेने काहीसं खच्ची झालेलं मनोबल, त्यांचा हुरुप वाढवणारं आहे. या साऱ्याचा विचार करता माईंड गेमध्ये माहीर असलेले कांगारु आपलं मैदानावरचं जगणं मुश्किल करण्यासाठी टपलेले असतील.  मंजिल मुश्किल है लेकिन नामुमकिन नही...

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane emotional PC : आज आहे, उद्या नसेन, पण नसलो तरी… पत्रकार परिषदेच्या शेवटी राणे इमोशनलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 22 March 2025Harshwardhan Sapkal PC | औरंगजेबाइतकेच इंग्रज क्रूर होते, त्यांची स्मारके काढणार का?Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
JAC meeting on Delimitation : अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
Embed widget