एक्स्प्लोर

लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!

Amit Thackeray : अमित ठाकरे सध्या माहीम मतदारसंघात फिरत आहेत. या मतदारसंघात ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महीम हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. याच कारणामुळे सध्या या मतदारसंघाला महत्त्व आले आहे. अमित ठाकरेंना (Amit Thackeray) विजयी करण्यासाठी मनसेने येथे पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अमित ठाकरेदेखील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.

लहानग्या उर्वशीचे अमित ठाकरेंना पत्र 

निवडणूक जिंकण्यासाठी अमित ठाकरे माहीममध्ये पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. या प्रचारात अमित ठाकरेंच्या पत्नीदेखील त्यांच्यासोबत आहेत. हे दाम्पत्य घरोघरी जाऊन लोकांची भेट घेत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, ते अशाच एका मनसे पदाधिकाऱ्याच्या घरी गेले होते. त्या घरी एका मुलीने काका तुम्हाला आमदार व्हायचंय असा हट्ट करत एक पत्र लिहिलंय. या पत्राची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. 

तुम्ही आमदार झाले पाहीजे हा माझा हट्ट...

या मुलीने अमित ठाकरे तुम्ही आमदार व्हायचंच आहे, असा पत्राच्या माध्यमातून बालहट्ट केला आहे. आमच्या भविष्यासाठी तुम्हाला आमदार व्हावे लागेल. तसेच पुढच्या वेळी घरी येताना आमदार अमित ठाकरे म्हणून या, असा उल्लेख या पत्रात आहे. तुम्ही आमदार झाले पाहीजे हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायाचा अशी या लहान मुलीने पत्रातून मागणी केली आहे.  

छोट्या मुलीच्या पत्रात नेमकं काय आहे?

अमित ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्याच्या घरी गेल्यानंतर अमित ठाकरे यांना एका छोट्या मुलीने पत्र दिलं. यात अमितकाका आमदार बनायचंय. आज आमच्या घरी तुम्ही अमित ठाकरे म्हणून आलात. पण पुढच्या वेळी आमदार अमित ठाकरे म्हणून या. आमच्या भविष्यासाठी काका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल. हा माझा हट्ट आहे आमि तो तुम्ही पूर्ण करायचाय. विजयी भव:... तुमचीच उर्वशी लक्ष्मण पाटील, असं या पत्रात लिहण्यात आलंय. 

दरम्यान, सध्या या पत्राची सगळीकडे चर्चा आहे. माहीम या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. येथे महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून नेमकं कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget