एक्स्प्लोर

Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?

Baramati Assembly Constituency : एक कार्यकर्ता अजित पवारांना म्हणाला की, काकींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. यावर अजित पवारांनी असलं प्रेम मला नको, असे उत्तर दिले आहे.

बारामती : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभरात जोरदार प्रचार केला जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीतील चार गावांच्या दौऱ्यावर असून पानसरेवाडी येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एक कार्यकर्ता अजित पवारांना म्हणाला की, काकींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. यावर अजित पवारांनी असलं प्रेम मला नको, असे उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. 

अजित पवार म्हणाले की, घरातील दोन उमेदवार उभे राहिले आहेत. लोकसभेला जो निकाल दिला त्याबाबत माझं काही म्हणणं नाही. ठेकेदारने खराब काम केलं तर दोष मलाच मिळतो. महिलांना आधी पुरुष मंडळी पैसे द्यायचे आणि हिशेब मागायचे. आता हिशेब द्यायची गरज नाही. आजपर्यंत तुम्ही नेहमी साथ दिली. तुम्ही लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जम्मत होईल, असे मिश्कील वक्तव्य अजित पवार यांनी केले. 

प्रतिभा काकींना नातवाचा पुळका का?

ते पुढे म्हणाले की, साहेब म्हणाले मी रिटायर होणार आहे. त्यामुळे पुढचे कोण बघणार आहे हे तुम्हाला माहित आहे. भावनिक होऊ नका. साहेबांचा फोटो लावला आहे. साहेबांची ही निवडणूक नाही ना? कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती? मी काय खतांडा पिताडा आहे का? मी बारामती तालुक्याची वाट लावली का? मी टीका करायला गेलो तर तो आहे माझा पुतण्या. मी टीका करायला गेलो की घरातल्या घरात कसे काढायचं? परत असं केलं तर नाभिक समाज नाराज होईल. मी निवडणूक झाल्यावर काकींना विचारणार आहे की, एवढा पुळका का होता? काल महिलांना 500 रुपये आणून बसवले. त्यांना चहा नाही पाणी नाही, ही बारामतीची पद्धत नाही. काम करण्यासाठी नेतृत्वात धमक असावी लागते, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. 

लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा

लोकसभेला बरेच लोक म्हणायचे की, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा आता कमी दिवस राहिले आहेत. या गावात सुनेत्राला 30 टक्के मते आणि सुप्रियाला 60 टक्के मते होती. यावेळेस चांगल्या पद्धतीने मतदान करावं ही विनंती आहे. पानसरेवाडीतील लोकांना जाऊन नमस्कार करावा म्हणून मी आलोय. मी ज्यांना पदे दिली तेच माझ्या विरोधात गेले, असेही अजित पवार यांनी म्हटले. 

असलं प्रेम मला नको

तरुणांनो मला यावेळी साथ द्या, मी तुम्हाला संधी देतो. बारामतीत अनेक निवडणुका लढवल्या पण चुकीचे पायंडे बारामतीत पडत आहेत. गाफील राहू नका. काही जण सांगतात मागे सुप्रियाला दिले आता दादांना मत देणार आहे. तुलना करू नाही पण, साहेबांपेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त कामे झाली, असं देखील म्हटलं जातं. साहेबांसोबत तुलना होते, त्यामुळे माझी सगळीकडूनच अडचण होते. आता काकी इकडे फिरत आहेत. काकी असं म्हणत असतील की, साहेबांना, दादांना भरभरून प्रेम दिलंय, एकदा बघून तरी याव नेमकं केलंय त्यांनी. अजित पवारांनी असे म्हणताच एक कार्यकर्ता अजित दादांना म्हणाला की, काकींना मी सांगिलते, काकी दादाला त्रास देऊ  नका. त्यावरती काकी हसल्या, कार्यकर्ता पुढे म्हणाला, काकींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, अजितदादा म्हणाले, असलं प्रेम मला नको. यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला होता.  

आणखी वाचा 

झोपी गेलेल्यांना जागं करण्याची हीच योग्य वेळ म्हणत फडणवीसांचं ट्वीट; कोणता मोठा गौप्यस्फोट करणार? राज्याचं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget