Earthquake : 'भारतातही होणार विनाशकारी भूकंप'; व्हायरल भविष्यवाणीनंतर आता भारतीय शास्त्रज्ञाचाही धोक्याचा इशारा
Earthquake Warning in India : भारतीय भूगर्भशास्त्रज्ञाने इशारा दिला आहे की, भारतीय टेक्टोनिक प्लेट दरवर्षी 5 सेमी वेगाने सरकत आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

NGRI Scientist Warns about Earthquake in India : तुर्की (Turkey) आणि सीरियामधील (Syria) भूकंपामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या भूकंपामध्ये तब्बल 45 हजारहून जणांचा मृत्यू झाला असून 80 हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. तुर्की आणि सीरियाप्रमाणे भारतामध्येही मोठा भूकंप येईल, असा अंदाज प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ आणि भूर्गभशास्त्रज्ञाने केला आहे. हैदराबादमधील एनजीआरआयच्या मुख्य शास्त्रज्ञाच्या मते, भारतीय टेक्टोनिक प्लेट सरकत असल्याने हिमालयीन प्रदेशात भूकंपाचा धोका वाढत आहे.
भारतीय शास्त्रज्ञाचाही धोक्याचा इशारा
एका प्रख्यात हवामानशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञाने इशारा दिला आहे की, भारतीय टेक्टोनिक प्लेट (Tectonic Plates) दरवर्षी 5 सेमी वेगाने सरकत आहे. त्यामुळे हिमालयीन प्रदेशातील तणाव वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात भूकंपाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी एका फ्रेंच शास्त्रज्ञाने ही भारतात येत्या काळात भूकंप येणार असल्याचं भाकित केलं आहे. याच भूर्गभशास्त्रज्ञाने तुर्की आणि सीरियाच्या भूकंपाबाबत वर्तवलेला अंदाजही खरा ठरला आहे.
भारतातही विनाशकारी भूकंप होणार?
भूकंपशास्त्रज्ञ आणि हैदराबादमधील जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (NGRI) प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन पूर्णचंद्र राव म्हणाले की, पृथ्वीचा बाह्य भाग वेगवेगळ्या प्लेट्सने बनलेला आहे आणि त्या प्लेट्स सतत सरकत असतात. भारतीय टेक्टोनिक प्लेट दरवर्षी 5 सेमी सरकतात. त्यामुळे हिमालयातील तणाव वाढत असून भूकंपाचा धोका वाढत आहे.
We've a strong network of 18 seismograph stations in Uttarakhand. The region referred to as the seismic gap between Himachal & western part of Nepal incl Uttarakhand is prone to earthquakes that might occur at any time: Dr N Purnachandra Rao, Chief Scientist & Seismologist, NGRI pic.twitter.com/N2xU1jZ53U
— ANI (@ANI) February 21, 2023
फ्रेंच शास्त्रज्ञाचं भारताबद्दलचं भाकित
भूगर्भशास्त्रज्ञ आणि डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स (Frank Hoogerbeets) यांनी भारतातही भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. हूगरबीट्स यांनी भारताबद्दल भाकित करत सांगितलं आहे की, भारताला मोठा भूकंपाचा धक्का बसणार आहे. हिंद महासागर क्षेत्रातील देश म्हणजे भारत, पाकिस्तानसह अफगाणिस्तानलाही याचा झटका बसणार आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी चीन आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.
हूगरबीट्स यांनी तुर्की आणि सीरियातील भूकंपाचा इशाराही खरा ठरला. मीडिया रिपोर्टनुसार, फ्रँक हूगरबीट्स यांनी 2019 मध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाबाबतही अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला. त्याआधी 2019 मध्येच त्यांनी 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान इराक आणि इराण सीमेवर भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती आणि तिथे 8 जुलै रोजी भूकंप झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























