एक्स्प्लोर

Delhi Election Results | उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अखेर आघाडी

पटपडगंज मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे स्टार प्रचारक आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया अखेर आघाडीवर गेले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे रवीद्र सिंह नेगी मैदानात आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सर्व 70 जागांचे कल समोर आले आहेत. कलांमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. या मतमोजणीत पटपडगंज विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. सलग नऊ फेऱ्यांमध्ये पिछाडीवर राहिल्यानंतर सिसोदिया अकराव्या फेरीत आघाडी घेतली आहे. सिसोदियांनी भाजपचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांच्यावर 700 मतांनी आघाडी मिळवली आहे. या आघाडीमुळे आपच्या जिवात जीव आला आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मनिष सिसोदिया पिछाडीवर होते. सिसोदिया नवव्या फेरीपर्यंत दुसऱ्या स्थानावर होते. मात्र अकराव्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आणि आता ते 700 पेक्षा जास्त मतांनी पुढे आहेत. या मतदारसंघात लक्ष्मण रावत हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. कलांमध्ये अद्यापही काँग्रेसचं खातं उघडलेलं नाही.

मनिष सिसोदिया हे दिल्ली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. शिवाय दिल्ली सरकारमध्ये सर्वाधिक खात्यांचा भार सिसोदियांकडे होता. सिसोदिया हे दिल्ली सरकारमधील सर्वात शक्तिशाली मंत्री आहेत. आम आमदी पक्ष ज्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक काम केल्याचा दावा करतो, त्यात शिक्षण विभागाचा समावेश आहे. हे खातं मनिष सिसोदिया यांच्याकडेच आहे. दुसरीकडे पटपडगंज विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे खासदार गौतम गंभीर यांच्या लोकसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे भाजपसाठी देखील हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे.

Delhi Election Results | महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी

Delhi Election Results | भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला : अनिल परब

याआधीच्या निवडणुकीतील चित्र 2013 च्या विधानसभा निवडणुकीत 'आप' उमेदवार मनिष सिसोदिया यांनी भाजप उमेदवार नकुल भारद्वाज यांना 11 हजार 476 मतांनी पराभूत केलं होतं. यानंतर 2015 मध्ये मनिष सिसोदिया यांनी भाजप उमेदवार विनोद कुमार बिन्नी यांचा 8 हजार 791 मतांनी पराभव केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget