एक्स्प्लोर

Delhi Election Results | महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांच्यासह 25 नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र याचा भाजपला फारसा फायदा झालेला नाही.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दिल्लीकर जनता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी राहिली आहे. दुसरीकडे भाजपला मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. इतकंच काय, दिल्लीच्या निवडणुकीसाठी भाजपला महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली होती. राज्यातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह 25 जणांवर दिल्ली निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु त्यांनी केलेला प्रचार विजयाच्या रुपात दिसला नाही. भाजपने 50 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला होता. परंतु हा दावा फोल ठरला आणि दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा सत्ता केजरीवालांच्या हाती सोपवण्याचा निर्णय दिला. दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिल्याचं चित्र आहे. आम आदमी पक्ष 57 जागांवर आघाडीवर तर भाजप 13 जागांवर पुढे आहे. काँग्रेसला अद्याप खातंही उघडता आलं नाही. हे कल आहेत, त्यामुळे आकडे बदलू शकतात. परंतु येत्या काही तासात चित्र स्पष्ट होईल. दिल्लीच्या निवडणुकीसाठी भाजपला महाराष्ट्रातून रसद; राज्यातील दिग्गज नेते प्रचारासाठी राजधानीत मागील निवडणुकीत 'आप'ला 67 जागांवर यश मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपच्या खात्यात तीन जागा गेल्या होत्या. याचाच अर्थात मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागांमध्ये जवळपास तीन पट वाढ झाली आहे. तर आपच्या जागांमध्ये घट झाली आहे. फडणवीस, तावडे, पाटलांना दिल्लीत जबाबदारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली. त्यानुसार राज्यातील एकूण 25 जणांवर जबाबदारी देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले होते. एवढंच नाही तर नाराजी नाट्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरजित सिंह ठाकूर यांचाही निवडणूक प्रचारात समावेश करण्यात आला होता. राज्यातील प्रत्येक नेत्याकडे एकूण 10 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी वाटून देण्यात आली होती. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रक वाटण्यावरुन सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. परंतु राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीत केलेल्या प्रचाराचा फारसा उपयोग झाला नसल्याचं निकालामुळे स्पष्ट झालं आहे. संबंधित बातम्या Delhi Election Results LIVE UPDATES | सुरुवातीच्या कलांनुसार दिल्लीत 'आप'चं सरकार Delhi Election 2020 | निवडणूक निकालांपूर्वीचं अलका लांबा यांचं 'हे' ट्वीट चर्चेत Delhi Elections Result 2020 : ‘फिर एक बार केजरीवाल’, पक्ष कार्यालयामध्ये जोरदार सेलिब्रेशन Delhi Election Results | सर्व 70 जागांचे कल हाती, 'आप'ला स्पष्ट बहुमत
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mirzapur Dog Bitten Case : कुत्र्यासारखा चालतोय, मोठ्यानं भुंकतोय; अँटी-रेबीज इंजेक्शन न घेतल्यानं झाली तरुणाची भयावह अवस्था, हादरवणारा व्हिडिओ व्हायरल
कुत्र्यासारखा चालतोय, मोठ्यानं भुंकतोय; अँटी-रेबीज इंजेक्शन न घेतल्यानं झाली तरुणाची भयावह अवस्था, हादरवणारा व्हिडिओ व्हायरल
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Iran Israel America War Impact in India: युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
Goverment On LPG Cylinder Shortage : ना रिफिलिंग, नाही नवीन कनेक्शन; गॅस पुरवठ्यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय, नियमांमध्ये नवा बदल
ना रिफिलिंग, नाही नवीन कनेक्शन; गॅस पुरवठ्यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय, नियमांमध्ये नवा बदल

व्हिडीओ

Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Embed widget