Buldhana News : विवाहित असूनही 25 वर्षीय युवतीवर प्रेम जडलं, स्वतःच्या घरात ही आणलं; पण विरहातून टोकाच पाऊल उचललं
Buldhana Crime News : सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात समाधान आटोळे या युवकाने प्रेयसी घरातून निघून गेल्याच्या विरहातून टोकाचे पाऊल उचलेल आहे.

Buldhana Crime News : सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात समाधान आटोळे या युवकाने प्रेयसी घरातून निघून गेल्याच्या विरहातून टोकाचे पाऊल उचलेल आहे. त्यात समाधानने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करत असताना त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत हे विष प्राशान करून आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत संपवलं आयुष्य
दरम्यान पुढे आलेल्या माहितीनुसार, समाधान आटोळे हा विवाहित असून जवळच असलेल्या एका गावातील 25 वर्षे युवतीवर त्याचं प्रेम जडलं होतं. या युवतीला त्याने आपल्या स्वतःच्या घरात ही आणलं होतं. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून हे सोबत देखील राहत होते. मात्र 13 मार्च रोजी समाधानची प्रेयसी घरातून निघून गेल्याने काल(20 मार्च) त्याने इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन केलं व आत्महत्या केली. प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
वर्ध्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 32 जणावर कारवाई
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई रेती घाटात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या पंधरा टिप्परवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 32 जणावर कारवाई करीत 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेकापूर रेती घाटातून अवैध रेती उपसा करून रेती वाहून नेणाऱ्या रेती माफियावर कारवाई करण्यात आली. दोन कार देखील पोलिसांनी जप्त केल्या आहे. रात्री दरम्यान अवैध रेती उपसा सुरू होता, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शेकापूर बाई ते अल्लीपूर मार्गाने वाहतूक करणाऱ्या पंधरा टिप्पर पकडण्यात आलेय. टिप्पर चालक व मालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहेय. अल्लीपूर पोलिसांनी कारवाई करीत ही वाहने जप्त केली आहेय.
रानडुकराच्या हल्ल्यात सनफ्लॅग कंपनीचे दोन कर्मचारी गंभीर
सनफ्लॅग स्टील कंपनीत कामावर जात असताना रानडुकरांच्या कळपानं हल्ला केल्यानं कंपनीचे दोन कामगार गंभीर जखमी झालेत. ही घटना सकाळी सिरसी या गावाजवळ घडली. पंकज मदनकर (३०) आणि मंगेश शहारे (२८) असं गंभीर जखमी असलेल्या कामगारांची नावं आहेत. हे दोघेही भंडाराकडून वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत दुचाकीनं जात असताना ही घटना घडली. त्यांच्यावर भंडारा शहरातील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

