Chhaava Box Office Collection Day 35: 'छावा'नं मोडला 'पुष्पा 2', 'स्त्री 2'चा माज; 35व्या दिवशी नावावर केला मोठा रेकॉर्ड
Chhaava Box Office Collection Day 35: 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाचे पाच आठवडे पूर्ण झाले आहेत, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरून खाली उतरण्यास तयार नाही. 35 व्या दिवशीही हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Chhaava Box Office Collection Day 35: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन पाच आठवडे झाले आहेत, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटानं आजपर्यंतच्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत. 'छावा'नं रिलीजच्या 35 व्या दिवशी म्हणजेच, पाचव्या गुरुवारी किती कमाई केली? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा'नं 35 व्या दिवशी किती कमाई केली?
'छावा' बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटानं केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केली नाही तर 'छावा'ला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. खरंतर, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे. ज्यामुळे 'छावा' एका महिन्याहून अधिक काळानंतरही बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटानं आधीच सर्व मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत आणि पाच आठवड्यांनंतरही 'छावा'ची बॉक्स ऑफिसवरची घौडदौड काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.
View this post on Instagram
- 'छावा'नं पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180.25 कोटी रुपये कमावले.
- चित्रपटाची तिसऱ्या आठवड्याची कमाई 84.05 कोटी रुपये होती.
- चौथ्या आठवड्यात 'छवा'नं 55.95 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- चित्रपटानं 29 व्या दिवशी 7.25 कोटी रुपये, 30 व्या दिवशी 7.9 कोटी रुपये आणि 31 व्या दिवशी 8 कोटी रुपये कमावले.
- 'छवा'नं 32 व्या दिवशी 2.65 कोटी, 33 व्या दिवशी 2.65 कोटी आणि 34 व्या दिवशी पुन्हा 2.65 कोटी कमावले.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 35 व्या दिवशीच्या कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छवा'ने रिलीजच्या 35 व्या दिवशी 2.35 कोटींची कमाई केली आहे.
- यासह, 'छावा'ची 35 दिवसांत एकूण कमाई आता 572.95 कोटी रुपये झाली आहे.
'छावा'चा 35व्या दिवशीही चमत्कार
'छावा'नं रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच विक्रम रचण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. या चित्रपटानं आतापर्यंत खूप कमाई केली आहे आणि दररोज हा ऐतिहासिक चित्रपट सर्व मोठ्या चित्रपटांसाठी स्पर्धा ठरत आहे. 35 व्या दिवशी पुन्हा एकदा 'छावा'नं कमाल केली आहे आणि तो सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. यासह त्यांनी स्त्री 2 आणि पुष्पा 2 लासुद्धा हरवलं आहे.
- 'छावा'नं 35व्या दिवशी 2.35 कोटी रुपये कमावले आहेत.
- स्त्री 2 नं 35 व्या दिवशी 2 कोटी रुपये कमावले.
- पुष्पा 2 ने 35 व्या दिवशी 1.65 कोटी रुपये कमावले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























