एक्स्प्लोर
Shani Transit 2025: अवघ्या 9 दिवसांतच शनिचा मोठा गेम! 'या' 4 राशींची साडेसाती सुरू होतेय, 'या' उपायांनी मिळेल आराम
Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्चला शनीचं मोठं संक्रमण होणार आहे. ज्याचा परिणाम विविध राशींवर दिसून येणार आहे. विशेषत: 4 राशींना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येतोय.

Shani Transit 2025 astrology marathi news Saturn big game in just 9 days Sade Sati is starting for these 4 zodiac signs relief with these remedies
1/6

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायाची देवता म्हटले जाते. जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्चला शनीचं मोठं संक्रमण होणार आहे. ज्याचा परिणाम विविध राशींवर दिसून येणार आहे. विशेषत: 4 राशींना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येतोय. साडेसातीपासून आराम मिळण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते केल्याने साडेसातीच्या प्रभावापासून आराम मिळू शकतो.
2/6

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि 29 मार्च रोजी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. शनीचा मीन राशीत प्रवेश होताच अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशांतता येऊ शकते. विशेषत: चार राशींसाठी मीन राशीतील शनीचे संक्रमण खूप आव्हानात्मक ठरू शकते. या राशीच्या लोकांना प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलावे लागेल. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
3/6

मेष - शनी मीन राशीत प्रवेश करताच तुमच्यासाठी साडेसातीचा काळ सुरू होईल. मीन राशीत शनीच्या भ्रमणादरम्यान तुम्हाला कोणतेही अवैध काम करणे टाळावे लागेल. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. पैशाच्या बाबतीत घाई करणे देखील तुम्हाला महागात पडू शकते. यावर उपाय म्हणून हनुमान चालिसाचे पठण करावे.
4/6

सिंह - शनीचे संक्रमण तुमच्या राशीतून आठव्या भावात असेल. या घरात शनीच्या उपस्थितीमुळे तुम्हाला अनावश्यक चिंता लागू शकतात. जास्त विचार केल्याने या काळात मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. सामाजिक स्तरावर, संभाषण करताना शब्दांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागेल. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. पायाच्या दुखण्याशी संबंधित आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. यावर उपाय म्हणून शनिवारी अन्न दान करावे.
5/6

कन्या - मीन राशीत शनीच्या भ्रमणादरम्यान तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. वैवाहिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदारासोबतचे छोटे वादही मोठ्या भांडणाचे कारण बनू शकतात. शनीची सातवी दृष्टी तुमच्या राशीवर राहील, त्यामुळे तुम्ही चुकीच्या कारणाने समाजात प्रसिद्ध होऊ शकता, त्यामुळे सावध राहा. यावर उपाय म्हणून कन्या राशीच्या लोकांनी शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करावा.
6/6

धनु - या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण जवळच्या नातेसंबंधात खट्टू ठरू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वयाचा अभाव तुमच्या मानसिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. प्रेमसंबंधांबाबतही सावध राहावे लागेल. करिअरच्या क्षेत्रात सहकारी तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. या काळात तुम्हाला प्रत्येक काम पूर्ण एकाग्रतेने करावे लागेल. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. यावर उपाय म्हणून या राशीच्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करावी.
Published at : 21 Mar 2025 09:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
भारत
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion