Ranbir Kapoor- Alia Bhatt: आलिया भट्ट रणबीर कपूरची पहिली बायको नाही? स्वतःच केला खळबळजनक खुलासा, म्हणाला, 'मी आजही तिच्यावर...'
Ranbir Kapoor: रणबीर कपूरनं नुकताच एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्यानं सांगितलं की, आलिया भट्ट त्याची पहिली पत्नी नाही. त्यांनं या संदर्भात एक किस्सा सांगितला.

Ranbir Kapoor- Alia Bhatt: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉलिवूडची (Bollywood) राधा आलिया भट्टनं (Alia Bhatt) अचानक लग्न उरकून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलेला. लग्नानंतर दोघींनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणबीर सध्या पत्नी आलिया, मुलगी राहा आणि आई नीतू यांच्यासोबत राहतोय. हे छोटसं कुटुंब अनेकदा एकत्र दिसून येतं. पण अगदी गुण्यागोविंदानं राहणाऱ्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली का? कारण रणबीरनं स्वतः एक खळबळजनक खुलासा केला आहे. रणबीरनं सांगितलं की, एखाद्या परिकथेप्रमाणे आलिया आणि त्याचा विवाहसोहळा पार पडला होता. पण, आलिया त्याची पहिली पत्नी नाही, असं रणबीरनं स्वतः म्हटलं आहे.
रणबीर कपूरनं एप्रिल 2018 मध्ये त्याची प्रिय पत्नी आलियाला डेट करायला सुरुवात केली आणि एप्रिल 2022 मध्ये त्याचं लग्न झालं. त्याच वर्षी या जोडप्यानं त्यांची मुलगी राहाचंही स्वागत केलं. पण, तुम्हाला माहीत आहे का? आलिया भट्ट रणबीर कपूरची पहिली पत्नी नव्हती? रणबीरनं नुकताच याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. रणबीरनं म्हटलं आहे की, आलिया त्याची पहिली पत्नी नाही.
एका तरुणीशी रणबीरनं गेटवरच उरकलेलं लग्न
रणबीर कपूरचे जगभरात चाहते आहेत. त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. मॅशेबल इंडियाला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत रणबीरनं खुलासा केला की, एक तरूणी सोबत ब्राम्हण घेऊन त्याच्या बंगल्यात आली आणि घराच्या गेटवरच रणबीरसोबत लग्न केलं. त्यानंतर मात्र ती त्याला पुन्हा भेटली नाही. रणबीरनं खुलासा केला की, तो अजूनही त्याच्या 'पहिल्या पत्नी'ला भेटण्याची वाट पाहत आहे.
रणबीरनं म्हटलं की, "मी याला वेडेपणा म्हणणार नाही. कारण याचा वापर नकारात्मक अर्थानं वापरला जातो. पण, मला आठवतंय की, जेव्हा माझ्या सुरुवातीच्या दिवसांत एक तरुणी आली होती आणि मी तिला कधीच भेटलो नव्हतो. पण, मला माझ्या वॉचमननं सांगितलं की, ती सोबत एक ब्राम्हण घेऊन आली आहे. तिनं मी माझ्या आई-वडिलांसोबत राहत असलेल्या गेटवरच लग्न केलं. तिथे गेटवर कुंकू आणि काही फुलं पडली होती. मी त्यावेळी घरात नव्हतो. मी शहराबाहेर होतो. मला वाटतं की, मी खूपच वेडेपणा केला होता. मी माझ्या पहिल्या पत्नीला अजून भेटलेलो नाही. म्हणून माझी आणि तिची कधी भेट होणार? याची मी आतुरतेनं वाट पाहतोय."
आलियानं कॉफी विथ करणमध्ये रणबीरसोबत लग्न करण्याची इच्छा केलेली व्यक्त
लहानपणापासूनच आलियाचं रणबीरवर क्रश होतं. याचा खुलासा तिनं स्वतः कित्येकदा केलेला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटात रणबीरला सपोर्टिंग असिस्टंटच्या रुपात काम करताना तिनं पाहिलं होतं. 2014 मध्ये आलियानं आपला बॉलिवड डेब्यू केला. त्यानंतर तिनं कॉफी विथ करणच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या गप्पांमध्ये आलियानं रणबीर कपूरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिनं शोमध्ये ब्रह्मास्त्रच्या शूटिंगची कहाणीही सांगितली.
आलिया म्हणाली होती, "जेव्हा मी सिंगल होते, तेव्हा माझ्या आजूबाजूचे सर्वजण, माझी बहीण आणि मित्र म्हणायचे की, तू आणि तो (रणबीर) एकत्र राहणार आहात. आम्ही आमच्या फ्लाईटमध्ये याबद्दल बोललो. आम्ही एकत्र बसलो होतो आणि नंतर त्याच्या सीटमध्ये काहीतरी गडबड झाली. नंतर त्याच्या सीट दुरुस्त करण्यात आली आणि तेव्हाच आम्ही नोट्स एक्सचेंज केले. तिथूनच सुरुवात झाली."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
