Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce: युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचा घटस्फोट मंजूर; वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिला निर्णय
Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce: युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे.

Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा आज (20 मार्च) घटस्फोट झाला आहे. वांद्रे कुटुंब न्यायालयात आज युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटावर सुनावणी झाली. यावेळी युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघंही वांद्रे कुटुंब न्यायालयात दाखल झाले होते. या सुनावणीत युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. 22 डिसेंबर 2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते.
वांद्रे कुटुंब न्यायालयानं घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं नकार दिला होता. यानंतर वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निकालाला युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिलासा नाकारल्याचा निर्णय रद्द केला. तसेच आगामी आयपीएलपूर्वी युझवेंद्र चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर आज वांद्रे न्यायालयाने युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे.
RJ महावशचे धनश्रीला टोमणे?
नुकतंच चहलन धनश्रीला 4.5 कोटींची पोटगी देण्यास समती दर्शवल्याचं वृत्त समोर आलं आहे. यानंतर आरे महावशने फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. "झूठ, लालच और फरेब से परे हैं..खुदा का शुक्र है आज भी खड़े हैं..." महावशनं पोस्ट करताच तिची पोस्ट व्हायरल झाली.
चहलने धनश्रीला 4.75 कोटी रुपये देण्याचं केलं मान्य-
धनश्री आणि युझवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धनश्रीला चहलने 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. फेब्रुवारी 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यावेळी दोघांनी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली. युझवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी 2.37 कोटी रुपये आधीच दिले आहेत. आता पोटगीची उर्वरित रक्कम घटस्फोटाच्या आदेशानंतर देण्यात येईल.
युझवेंद्र चहल अन् आरजे महावशच्या डेटिंगची चर्चा-
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान (Champions Trophy 2025) भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महावश (RJ Mahvash) दुबई क्रिकेट मैदानावर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. युझवेंद्र चहल आणि आरजे महावशला एकत्र पाहिल्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

