Chaitra Amavasya : 29 की 30 मार्च? चैत्र अमावस्या नेमकी कधी? जाणून घ्या स्नान-दान आणि शुभ मुहूर्त
Chaitra Amavasya 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा 29 मार्च रोजी चैत्र अमावस्या साजरी केली जाणार आहे. याचा शुभ मुहूर्त आणि तिथी नेमकी कधी ते जाणून घेऊयात.

Chaitra Amavasya 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चैत्र अमावस्येचं खास महत्त्व आहे.या दिवशी दान-स्नानासह पितरांच्या श्राद्ध तर्पणाला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, या दिवशी पितरांच्या निमित्ताने श्राद्ध आणि तर्पण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. पितरांच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा 29 मार्च रोजी चैत्र अमावस्या साजरी केली जाणार आहे. याचा शुभ मुहूर्त आणि तिथी नेमकी कधी ते जाणून घेऊयात.
चैत्र अमावस्या 2025 तिथी (Chaitra Amavasya 2025 Tithi)
वैदिक पंचांगानुसार, चैत्र अमावस्या तिथी 28 मार्च रोजी रात्री 07 वाजून 54 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 29 मार्च रोजी संध्याकाळी 04 वाजून 26 मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार, 29 मार्च रोजी चैत्र अमावस्या साजरी केली जाणार आहे. तर, 29 मार्च रोजी म्हणजेच या वर्षाची पहिली शनी अमावस्या शनिवारी होणार आहे.
चैत्र अमावस्या 2025 स्नान-दान मुहूर्त
पंचांगानुसार, चैत्र अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात स्नान आणि दानाची वेळ सकाळी 04.42 पासून ते 05.28 पर्यंत असणार आहे. या दिवशी अभिजीत मुहूर्त रात्री 12.01 पासून ते 12.51 पर्यंत असणार आहे. अभिजीत मुहूर्तावर स्नान-दान करणं फार शुभ मानलं जातं.
चैत्र अमावस्येचं महत्त्व (Chaitra Amavasya 2025 Importance)
चैत्र अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात. त्याचबरोबर चैत्र अमावस्येला जेव्हा तुम्ही स्नान कराल त्यानंतर काळे तीळ आणि पांढऱ्या फुलांनी पितरांना तर्पण करा. तर्पण केल्याने पितर तृप्त होतात. त्याचबरोबर वंश वृद्धीचा आशीर्वाद घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















