Delhi Election Results | भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला : अनिल परब
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (11 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्येच आम आदमी पक्षाने आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भारतीय जनता पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मात्र अद्याप एकाही जागेवर खातं उघडता आलेलं नाही.
मुंबई : दिल्ली निवडणूकांच्या 70 जागांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार देशाच्या राजधानीत आम आदमी पक्षाची सत्ता प्रस्थापित होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाची हॅट्रीक करणार असल्याच्या चर्चां सुरू झाल्या आहेत. अशातच आम आदमी पक्षाची सत्ता लोकांनी मान्य केली आहे. तर भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलं आहे, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेने देशाच्या राजकारणाला वळण दिलं आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे देशातही तेच घडत आहे, असंही ते बोलताना म्हणाले.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. याबाबत बोलताना अनिल परब यांनी भाजपवर टीकेची झोड केली आहे. अनिल परब बोलताना म्हणाले की, 'महाराष्ट्रात जे सत्ता परिवर्तन झालं आहे, त्यामुळे देशाच्या राजकारणाला शिवसेनेने वेगळं वळण दिलं आहे, त्याचेच परिणाम दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये दिसून येत आहेत.' तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, 'देशद्रोहाची व्याख्या काय आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे, तसेच ती लोकांना मान्य करायला पाहिजे, केवळ एका व्यक्तीने देशद्रोहाची व्याख्या करणं, म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनाही ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे हे त्यांना आज दाखवून दिलं आहे.'
भाजपचे अनेक दिग्गज नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले होते, फक्त महाराष्ट्रातूनच नाहीतर संपूर्ण देशभरातून अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी गेले होते. तरीही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर भाजप विजय मिळवू शकला नाही. तसेच दिल्लीत जे भाजप नेते आहेत त्यांनाच लोकांनी नाकारलं आहे, असं आम्ही मानतो. अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, 'ओहोटी-भरती राजकारणात सुरूच असते, परंतु फक्त आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय इतर कोणीच राज्य करू शकणार नाही. हा अहंकार लोक उतरवतात.'
पाहा व्हिडीओ : दिल्लीकरांची पुन्हा आम आदमी पक्षाला साथ, विश्लेषकांमध्ये खडाजंगी
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (11 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांमध्येच आम आदमी पक्षाने आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भारतीय जनता पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मात्र अद्याप एकाही जागेवर खातं उघडता आलेलं नाही. अशातच दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यानुसार, दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या :
Delhi Election Results LIVE UPDATES | सुरुवातीच्या कलांनुसार दिल्लीत 'आप'चं सरकार
Delhi Election 2020 | निवडणूक निकालांपूर्वीचं अलका लांबा यांचं 'हे' ट्वीट चर्चेत
Delhi Election Results | सर्व 70 जागांचे कल हाती, 'आप'ला स्पष्ट बहुमत
Delhi Election 2020 : निकाला आधीच भाजपने पराभव स्वीकारला होता? कार्यालयाबाहेरील पोस्टरवरून चर्चा
Delhi Elections Result 2020 : ‘फिर एक बार केजरीवाल’, पक्ष कार्यालयामध्ये जोरदार सेलिब्रेशन