IPL 2025: मोठी बातमी: मुंबई इंडियन्स पाठोपाठ राजस्थान रॉयल्सनेही कर्णधार बदलला, संजू सॅमसनच्या जागी नवा कर्णधार!
IPL 2025 Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मोठा निर्णय घेतला आहे.

IPL 2025 Rajasthan Royals: आयपीएल 2025 चा (IPL 2025) हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2025 च्या आधी राजस्थान रॉयल्सने संघात मोठा बदल केला आहे. रियान परागला (Riyan Parag) कर्णधार बनवण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सने घेतला आहे. राजस्थानने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्टही शेअर केली आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने देखील पहिल्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व दिले आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे सूत्रे सांभाळेल.
राजस्थान रॉयल्सने पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान परागकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. या तीन सामन्यात संजू सॅमसन संघात फक्त फलंदाज म्हणून खेळेल. गेल्या काही आठवड्यांपासून बोटाच्या दुखापतीने त्रस्त असलेला संजू सॅमसन अद्याप त्यातून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून संजू सॅमसनला फलंदाजीची परवानगी मिळाली आहे पण विकेटकीपिंगसाठी अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे राजस्थानच्या व्यवस्थापनाने रियान परागला पहिल्या तीन सामन्यांचे नेतृत्व देण्याचे ठरवले आहे.
💪 Update: Sanju will be playing our first three games as a batter, with Riyan stepping up to lead the boys in these matches! 💗 pic.twitter.com/FyHTmBp1F5
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 20, 2025
कोणत्या सामन्यात रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करणार?
पहिल्या तीन सामन्यांसाठी रायनला कर्णधारपद मिळाले आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा पहिला सामना हैदराबादशी आहे. हा सामना 23 मार्च रोजी खेळवला जाईल. यानंतर, राजस्थानचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी आहे. हा सामना 26 मार्च रोजी गुवाहाटी येथे खेळला जाईल. तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्जशी आहे. हा सामना 30 मार्च रोजी खेळला जाईल.
मुंबईच्या हार्दिक पांड्यावर बॅन-
आयपीएलच्या 2025 च्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला खेळता येणार नाही. त्यामुळे एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचं कर्णधार सुर्यकुमार यादव सांभाळताना दिसताना दिसेल. आयपीएल 2024 च्या मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर हार्दिक पांड्यावर वर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. एमआय संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नसल्याने आयपीएल 2025 च्या हंगामापर्यंत बंदी कायम राहील. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या चेन्नईविरुद्ध संघाचा पहिला सामना खेळू शकणार नाही. हार्दिकला आयपीएल 2024 मध्ये तीन ओव्हर-रेट गुन्ह्यांसाठी दंड ठोठावण्यात आला होता. लीगच्या नियमांनुसार, जेव्हा एखादा संघ एका हंगामात तीन वेळा आवश्यक ओव्हर-रेट राखण्यात अपयशी ठरतो, तेव्हा कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते.
20 March 2025 सकाळी 11च्या हेडलाईन्स, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

