Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील विविध महत्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates: नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नागपुरातील राड्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. काही तरुण रेकी करत असल्याचं चित्रीत, तर याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घडामोडींसह राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...
धुळ्यातील हमालांनी पुकारला संप; माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निघाला मोर्चा
धुळे : जिल्ह्यातील गावं, खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेने कडकडीत बंद पाळला आहे. या पार्श्वभुमीवर सर्व हमाल कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला, या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या. तसेच मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये (साक्री, पिंपळनेर, मोराणे) माथाडी कायदा लागू करुन खाजगी बाजार समितीमधील काम आमच्या कामगारांना मीळाले पाहिजे. यासाठी अनेक वर्षापासून आमचे प्रयत्न सुरु आहे. मात्र, आजपावेतो त्या ठिकाणी माथाडी कायदा लागू केलेला नाही, तरी जिल्ह्यात संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाण्यात आला.
अक्कलकोटमधील बियर शॉपीच्या परवान्यावरून विधानसभेत सचिन कल्याणशेटी आक्रमक
मुंबई : अक्कलकोटमधील बियर शॉपी च्या परवान्यावरून विधानसभेत सचिन कल्याणशेटी आक्रमक झाले. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेर असणाऱ्या बिअर शॉपीच्या परवान्यावरून सचिन कल्याणशेट्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक वाद झालेत. बनावट कागदपत्राद्वारे बिअर शॉपीस परवानगी दिल्याची माहिती कल्याणशेट्टी यांनी लक्षवेधीत मांडली. तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ मंदिरापासून 300 मीटरवर बिअर शॉपी असल्याचा सचिन कल्याणशेट्टींचा दावा तर संबंधित बियर शॉपी दीड किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तर लक्षवेधीत सोलापुरातील एक्साईज अधिकाऱ्यांवर आमदार कल्याणशेट्टी यांनी तीव्र नाराजी दर्शवली. सदर प्रकरणाची चौकशी करून अधिकारी दोषी असतील तर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या





















