एक्स्प्लोर

Corona Update | कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण, 'या' रुग्णांवर डब्लूएचओची नजर

दक्षिण कोरियात कोरोनामुक्त झालेल्या 91 रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. कोरोना नवीन आजार असल्याने या रुग्णांच्या रिपोर्ट्सवर डब्लूएचओतर्फे लक्ष ठेवलं जाणार आहे.

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी जिनिव्हा येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत खुलासा केला आहे. यामध्ये आरोग्य संघटनेनं म्हटलं की, कोरोनामुक्त झाल्यानंतरही ज्या रुग्णांची कोरोना टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह मिळाली, अशा रुग्णांच्या रिपोर्ट्सना मॉनिटर करत आहोत. म्हणजे विलगीकरणादरम्यान उपचारानंतर ज्या रूग्णांना डिस्चार्ज देण्याचे ठरत होते, ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती ते पुन्हा पॉझिटिव्ह कसे काय? यासाठी त्याच्या रिपोर्ट्सवर डब्लूएचओतर्फे लक्ष ठेवलं जाणार आहे.

कोरोना विषाणूची लागण दुसऱ्यांदा होऊ शकते का?

दक्षिण कोरियात शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 91 रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या रुग्णांची नव्याने केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांची नवीन कोरोना टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले. कोरिया सेंन्टर फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंन्शनचे संचालक (Jeong Eun-kyeong) यांच्या मते हा विषाणू पुन्हा रिअॅक्टिवेट झाला असावा, रुग्णाला दुसऱ्यांदा लागण झाली नसावी.

जिनिव्हा स्थित जागतिक आरोग्य संघटनेने सिओलहून याबाबत रिपोर्ट्स मागवले असल्याचे रॉयटर्सला माहिती देत स्पष्ट केलं की, "ज्या रुग्णांची कोविड- 19 साठी पीसीआर टेस्ट (पोलिमेर्स चेन रिएक्शन टेस्ट) निगेटिव्ह आली होती, अशा रुग्णांची काही दिवसांनी घेतलेली टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही तज्ज्ञांकडून हे समजून घेत, प्रत्येक रुग्णांच्या केसची माहिती गोळा करण्याच्या कामावर मेहनत घेत आहोत. टेस्टिंगसाठी संभावित रुग्णांचे सॅम्पल्स घेताना, योग्य ठरवलेल्या पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे."

रुग्णांच्या क्लिनिकल व्यवस्थापनासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे एका रूग्णाला हॉस्पिटलमधून तेव्हाच डिस्चार्ज करता येतं, जेव्हा डॉक्टरच्या देखरेखीत बरा झालेल्या त्या रूग्णाच्या घेतलेल्या दोन्ही टेस्ट्स निगेटिव्ह येतात. सध्या सुरु असलेल्या अभ्यासावरुन कोविड- 19 ची मध्यम प्रमाणात लागण झाल्यापासून त्या रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीत बरं होण्यासाठी दरम्यान दोन आठवडे लागतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रुग्णालयात बरे झालेल्यांपैकी काही रूग्णांची पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे, हे माहित आहे. पण या विषाणूचा संसर्ग पूर्ण नाहिसा होण्यासाठी किती वेळ लागतो हे समजून घेण्यासाठी, बरे झालेल्या रुग्णाच्या सॅम्पल्सचे कलेक्शन शास्त्रशूद्ध पद्धतीनेच होणे गरजेचे आहे. दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते नवीन कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याबाबत अजून स्पष्ट व्हायच्या आहेत. या संसर्गजन्य रोगाबाबत शोध घेणं अजून सुरूच आहे.

कोविड - 19 नवीन रोग आहे, या विषाणूबाबत कुठल्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी या संसर्गजन्य रोगावर जास्त माहितीची गरज आहे, असं मत जागतिक आरोग्य संघटनेने दर्शवले. शुक्रवारपर्यंत कोविड-19 च्या मृतांचा आकडा एक लाखाहून जास्त गोला आहे, तर रिपोर्ट केलेल्या केसेस 16 लाखांवर गेल्याचं रॉयटर्स या एजंसीने सांगितले.

संबंधित बातम्या  Coronavirus | WEB Exclusive | PPE Kit म्हणजे नेमकं काय? उत्तम क्वॉलिटीचे पीपीई कीट वापरणं का आवश्यक?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पाGhatkopar Fire : प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
Embed widget