एक्स्प्लोर

भारतातला कोरोना विषाणू वेगळा? 'या' राज्याने केली संशोधनाची मागणी

भारताची लोकसंख्या पाहता अद्याप तरी अमेरिका इटलीच्या तुलनेत भारतात कोरोनाचा कमी प्रसार आहे. त्यामुळे जगातल्या माध्यमात भारताविषयी अनेक चर्चा सुरु आहेत.

मुंबई : जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आणि भारतातला कोरोना विषाणू वेगळा आहे का? असा प्रश्न तामिळनाडू सरकारला पडला आहे. देशभरात तबलीकीशी संबंधीत असलेल्या बहुतेक बाधित पेशंटमध्ये कोरोनाची लक्षणचं आढळून आलेली नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या भारतीय अवताराबद्दल संशोधन व्हावी अशी मागणी तामिळनाडू सरकारने केंद्राकडे केली आहे. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरत चाललाय. पण भारताची लोकसंख्या पाहता अद्याप तरी अमेरिका इटलीच्या तुलनेत भारतात कोरोनाचा कमी प्रसार आहे. त्यामुळे जगातल्या माध्यमात भारताविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. जगातल्या माध्यमात भारतात का कोरोनाचा प्रादुर्भाव कमी का आहे त्याची तीन कारण चर्चेत आहेत. त्यात बीसीजी,  हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि तापमान ही महत्वाची कारणं आहेत. भारतात ज्यांना लक्षणे आहेत अशांची तपासणी केली तर 3 टक्के खाजगी लॅबमधली फक्त 0.2 टक्के पाॅझिटिव्ह आढळून आलेत. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशात इतर देशांच्या तुलनेत कमी प्रसार आहे. त्याची कारणं काही विश्लेषकांना कोरोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत का असं वाटत आहे. हे जाणून घेण्यासाठी जगातले तज्ञ जागतिक पातळीवर ओपन सोर्स वेबसाइट नेक्स्टस्टाईनवर जावून शोध घेताहेत. ही वेबसाईट जगातल्या विषाणूच्या संदर्भातली अधिकत माहितीचं स्त्रोत आहे. वेबसाईटच्या संशोधन आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोरोनाव्हायरसचे 8 ते 18 वेगवेगळे प्रकार आहेत. पण हे वेगवेगळे विषाणू नाहीत तर शास्त्रीय भाषेत त्याला म्युटेशन म्हणतात. म्हणजे किंचीत बदल आहेत. चीनमधून आलेल्यापेक्षा किंचीत वेगळे असले तरी ते कमी किंवा अधिक घातक नाहीत. आजवरच्या संशोधनात कोरोना हे चीनचे अस्त्र नाही हे ही सिध्द झाले आहे.  तरीही जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आणि भारतातला कोरोना विषाणू वेगळा आहे का? असा प्रश्न तामिळनाडू सरकारला पडलाय. तबलीकीशी संबंधीत असलेल्या बहुतेक बाधित पेशंटमध्ये कोरोनाची लक्षणचं आढळून आलेली नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या ह्या अवताराबद्दल संशोधन व्हावा अशी मागणी तामिळनाडू सरकारने केंद्राकडे केली आहे. पुण्याच्या एनआयव्हीने असा अभ्यास केला आहे. पुण्याच्या एनआयव्हीने 881 पेशंटचे सॅंपल तपासल्यावर ह्या अभ्यासाच्या नोंदी इंडीयन मेडिकल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. 25 फेब्रुवारीला तयार झालेला एक अहवाल आहे. चीनच्या वुहानशी तुलना करता 99.99 टक्के साम्य आहे. पण भारतात एकाच विषाणूत दोन सूक्ष्म बदल आहेत. ‘स्ट्रेन’ हा व्हायरसचा एक उप-प्रकार आहे, जो पेशींच्या वेगवेगळ्या पृष्ठभागावरील प्रथिने वरून ओळखतां येतो. एखादा विषाणू खूप वेगाने बदल करत आसेल तर उपचारासाठी तयार झालेल्या लस निरुपयोगी ठरतात. सध्या कोरोनामध्ये जे बदल होत आहेत तो स्ट्रेन नाही पण कोरोनातले सूक्ष्म बदलामुळे सुध्दा जगभरात एकच एक लस वापरणे शक्य होईल का? या विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget