एक्स्प्लोर

महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

महाराष्ट्रात तरी 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र काही राज्यांतील मुख्यमंत्री यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबईसह काही शहरात परिस्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने महाराष्ट्रात तरी 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केलं आहे. या कोरोना संकटातही महाराष्ट्र ठाम उभा राहून जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या संकटामध्ये सर्व राज्ये देशाच्या पाठीशी उभा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सर्व राज्यांना योग्य त्या सूचना देत आहेत. यात राजकारण आणू नये ही विनंती आहे. राजकारण आपण आयुष्यभर करत आलो. मात्र, राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

आजच्या या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. हे लॉकडाऊन नसून लोकइन असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. उद्याच्या उज्वल भारतासाठी माणसांचा जीव सर्वकाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम राहणार आहे. या काळात सर्व बॉर्डर बंद राहतील. जे कामगार अडकले आहेत, तेही राज्य सोडून जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशात कोरोनाबाबत एकच भूमिका राहणार असल्याचंही ते म्हणाले. आता लॉकडाऊन काढले तर जे मिळवले ते सर्व जाईल, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार असल्याचं त्यांनी सांगितले. या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी 14 एप्रिलपर्यंत आम्ही स्पष्ट करीत आहोत. येत्या 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, काही राज्यांनी हे लॉकडाऊन वाढण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, 14 नंतर 30 एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन राहील पण 14नंतर साधारणतः काय करणार याच्या सूचना मग शाळा आणि विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योगधंद्यांच काय होणार याची सगळ्यांची उत्तरे मी आपल्याला 14 तारखेपर्यंत देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनासाठी चीन इतकंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनही जबाबदार : सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग

पंतप्रधानांच्या बैठकीत काय झालं? आज पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहभागी होऊन संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपास्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम पंतप्रधानांना राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत अवगत केले. ते म्हणाले की राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे 33 हजार चाचण्या घेण्यात आल्या असून 1574 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर 30 हजार 477 जणांचे निगेटिव्ह आहेत. 188 रुग्ण बरे करून घरी पाठवले आहेत.

Lockdown extend in Maharashtra | महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवालABP Majha Headlines : 01 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSaleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP MajhaBeed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Devendra Fadnavis: फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Embed widget