Ajay Munde on Suresh Dhas : धनंजय मुंडेंचा भाऊ मैदानात, सुरेश धसांवर आगपाखड, म्हणाला, 'धस किती धुतल्या तांदळाचे?'
Ajay Munde on Suresh Dhas : धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक बाबींवर सुरेश धसांनी टीका केली होती. यावरून धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Ajay Munde on Suresh Dhas : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कौटुंबिक बाबींवर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टावर जोरदार हल्ला चढवला होता. यानंतर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे (Ajay Munde) आज माध्यमांशी संवाद साधत सुरेश धस यांचे आरोप फेटाळले आहे. सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
अजय मुंडे म्हणाले की, सुरेश धस यांनी एका वृत्त वहिनीवर मुलाखत दिली. त्यात धनंजय मुंडे साहेबांची आई त्यांच्यासोबत राहत नाही, असे चुकीचे वक्तव्य केले होते. सुरेश धस हे मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल बोलत आहेत. त्या परळीला आल्या नाही. त्यांचे चुलत भाऊ नाराज आहेत. कौटुंबिक कलह असल्याचा त्यांनी आरोप केला. पण आमच्या बाई परळीत राहत होत्या. मात्र त्या गावी राहत आहे. धनंजय मुंडे त्यांच्या आई सोबतच राहतात. धस यांच्या आरोपाला अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले.
सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत
अजय मुंडे पुढे म्हणाले की, अजून किती दिवस गप्प बसायचे? संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यासारखं नेतृत्व व्हायला 20 वर्ष लागले. त्यांच्यावर आरोप नसताना त्यांना बदनाम केले जात आहे. सध्या आमच्या घराचा काम सुरू आहे. गावाला जाऊन राहणं गुन्हा आहे का? मुंडे साहेब देखील तिथेच राहत होते. सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत, हे माहीत आहे. सुरेश धस खोक्या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आरोप करून पळून जातात, पुरावे द्या
आमच्यावर आता कौटुंबिक आरोप केले जात आहेत. मात्र त्याला काहीही अर्थ नाही. कोणीतरी बोलले पाहिजे म्हणून मी इथे बोलायला आलो आहे. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपपत्र आम्ही पूर्ण वाचलेले नाही. जे आरोपी आहेत, त्यांना कडक शासन झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यांनी आज कुटुंबावर केले, म्हणून आम्ही पुढे येऊन बोलत आहोत, असेही त्यांनी म्हटले. तर सुरेश धस आरोप करून पळून जातात, पुरावे द्या, असा आव्हान देखील अजय मुंडे यांनी सुरेश धस यांना दिले आहे. नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस? सुरेश धस यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलताना म्हणाले होते की, धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडच्या संपूर्ण आहारी गेले. वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांना काहीचे बघायचे शिल्लक ठेवले नाही. कदाचित मी बोलत आहे हे शब्द चुकीचे अजिबात नसणार.धनंजय मुंडेंचे घरातले चुलत भाऊ वगैरे किंवा त्यांच्या सौभाग्यवती त्या सुद्धा या प्रकारामुळे थोड्याफार प्रमाणात नाराज असतील. त्याने घरातल्या कोणाचेच काही चालू दिले नाही. धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षापासून नाथऱ्याला राहायला गेल्या आहेत. अजूनपर्यंत आलेल्याच नाहीत, त्या घराची अजूनही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे एखादा मित्र म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून कोणावर किती जबाबदारी सोपवायची हे धनंजय मुंडे यांना कळालेच नाही, असे त्यांनी म्हटले होते.
नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस?
सुरेश धस यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलताना म्हणाले होते की, धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडच्या संपूर्ण आहारी गेले. वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांना काहीचे बघायचे शिल्लक ठेवले नाही. कदाचित मी बोलत आहे हे शब्द चुकीचे अजिबात नसणार.धनंजय मुंडेंचे घरातले चुलत भाऊ वगैरे किंवा त्यांच्या सौभाग्यवती त्या सुद्धा या प्रकारामुळे थोड्याफार प्रमाणात नाराज असतील. त्याने घरातल्या कोणाचेच काही चालू दिले नाही. धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षापासून नाथऱ्याला राहायला गेल्या आहेत. अजूनपर्यंत आलेल्याच नाहीत, त्या घराची अजूनही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे एखादा मित्र म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून कोणावर किती जबाबदारी सोपवायची हे धनंजय मुंडे यांना कळालेच नाही, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
