एक्स्प्लोर
Home Loan : गृहकर्जावर 700000 पर्यंत करसवलत, लाभ कसा घ्यायचा? कर्ज घेण्यापूर्वी काय करावं? जाणून घ्या
Home Loan : अनेकांना शहरांमध्ये घर खरेदी करायचं असतं तेव्हा किंवा घर बांधायचं असतं तेव्हा गृहकर्ज घ्यावं लागतं. पती पत्नीनं संयुक्तपणे कर्ज काढल्यास करामध्ये सवलत मिळवता येईल.
गृहकर्ज करसवलत
1/6

घर खरेदीसाठी गृह कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. गृह कर्ज काढल्यानंतर त्याची अनेक वर्ष तुम्हाला परतफेड करावी लागते. मात्र, होम लोनमधून खरेदी केलेलं घर हे तुमच्या वेल्थ क्रिकेशनमध्ये मदतशीर ठरु शकतं. घरामुळं तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू शकते.
2/6

पती पत्नीनं मिळून गृह कर्ज काढल्यास करसवलत अधिक मिळू शकते. याशिवाय गृहकर्जासाठी अधिक रक्कम मिळू शकते. एक किंवा अधिक व्यक्ती मिळून गृह कर्ज काढू शकतात. जर पती पत्नीनं मिळून गृह कर्ज काढल्यास फायदा मिळतो.
3/6

पती-पत्नीनं संयुक्तपणे गृहकर्ज काढल्यास अधिक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होता. यामुळं बँक किंवा एनबीएफसी पती आणि पत्नीच्या उत्पन्नाच्या आधारे अधिक कर्ज देऊ शकतात. यामुळं मोठं घर खरेदी करु शकता.
4/6

दोघांच्या नावावर गृहकर्ज काढलं असल्यानं दोघांवर ईएमआय भरताना जबाबदारी राहते. यामुळं आर्थिक शिस्तदेखील राहते. पती-पत्नी दोघेही करसवलतसाठी क्लेम करु शकतात.
5/6

काही बँका महिला कर्जदारांना व्याजदरात सूट देतात. साधारणपणे व्याज दरात 0.05 -0.10 टक्के सूट मिळते. काही राज्यांमध्ये महिलांच्या नावावर घर घेतल्यास स्टॅम्प ड्युटीत सूट मिळते.
6/6

गहकर्ज संयुक्तपणे असल्यास पती पत्नी स्वतंत्रपणे करसवलतीसाठी क्लेम करतात. दोघांना दीड लाख रुपयांची करसवलत मिळवता येऊ शकते. गृह कर्ज घेतल्यानंतर त्या घरात राहत असल्यास 2 लाखांपर्यंतची सूट आयकरात मिळू शकते. याशिवाय घर जर भाड्यानं दिलं तर इनकम फ्रॉम पॉपर्टी हेड या अंतर्गत 2 लाखांपर्यंत कर वाचवता येऊ शकतो. म्हणजेच संयुक्तपणे गृह कर्ज काढल्यास 7 लाखांची करसवलत मिळवता येऊ शकते.
Published at : 11 Mar 2025 02:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
पुणे
महाराष्ट्र


















