Rajshri Deshpande: सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेने ऊस कामगारांच्या मुलांसाठी उभी केली शाळा
Aurangabad : औरंगाबादच्या ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्ते एका जिल्हा परिषदेच्या शाळेचे लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या शाळेची ईमारत राजश्रीने स्वखर्चाने उभी केली आहे.
Rajshri Deshpande: बहुचर्चित असलेल्या सेक्रेड गेम्स (sacred games) या वेबसिरीजमुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेला (rajshri deshpande) आपण आतापर्यंत अनेक चित्रपटात पाहिले आहे. मात्र अभिनयाच्या पलीकडे राजश्री करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची देखील अनेकदा चर्चा होते. तिच्या अशाच एका सामाजिक उपक्रमांने सर्वांचे मनं जिंकले आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबादच्या ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्ते एका जिल्हा परिषदेच्या शाळेचे (zp School) लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या शाळेची ईमारत राजश्रीने स्वखर्चाने उभी केली आहे.
अंदाजे 500 लोकसंख्या असलेल्या औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन तांड्यावरील जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस आली होती. त्यामुळे मुलांना शाळेत बसणे शक्य नव्हते. त्यातच अनेक ऊस तोड कामगार आपल्या मुलांना शाळेत न पाठवता कामाला सोबत घेऊन जायचे. शाळेतील काही शिक्षकांनी याबाबत राजश्रीशी संपर्क केला. शाळेची अडचण सांगितली. गावातील लोकांनी जागा ही उपलब्ध करून दिली, मात्र शाळा बांधण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आपण नवीन शाळा उभी करून देऊ असे आश्वासन राजश्रीने गावकऱ्यांना दिले.
आणि नवीन शाळा उभी राहिली...
ढोरकीन तांड्यावरील अंदाजे 40 पेक्षा अधिक मुलांना शाळेची व्यवस्थित सोय नसल्याने, पालकांनी त्यांना शाळेत पाठवणे बंद केले होते. त्यामुळे आपण दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे राजश्रीने ठरवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने शाळेच्या कामाला सुरवात झाली. सुसज्ज असे वर्ग, खेळण्यासाठी मैदान अशा या निसर्गरम्य वातावरणातील शाळेचे आज लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी गावकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तर नवीन शाळेतील पहिल्या दिवशीचा आगळावेगळा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
राजश्रीने कायापालट केलेली तिसरी शाळा...
अभिनेत्री असलेली राजश्री सामजिक उपक्रमात प्रामुख्याने उपस्थित असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. राजश्रीने नभांगण नावाच्या एनजीओची स्थापना केली. मुलांसाठी चांगल्या वातावरणातलं शिक्षण हे या एनजीओचं उद्दिष्ट आहे. यापूर्वी तिने मराठवाड्यातलं पांढरी आणि अमनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट केला होता. त्या नंतर आता ढोरकीन येथील तांड्यावर शाळेसाठी नवीन ईमारत उभी केली आहे.
कोण आहे राजश्री
राजश्रीनं आमिर खानच्या तलाश या चित्रपटातून बॉलीवूड सिनेमात पदार्पण केलं. त्यानंतर सलमान खानचा गाजलेला चित्रपट किकमध्ये सुद्धा तिने भूमिका साकारली होती. दरम्यान अनेक चित्रपट आणि मालिकेतही राजश्रीची भूमिका पाहायला मिळाली होती. पण सर्वाधिक गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक असलेल्या सेक्रेड गेम्समधील भूमिकेमुळे राजश्री चर्चेत आली.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI