एक्स्प्लोर

बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती

बँकॉकला "बिझनेस ट्रिप"साठीच चाललो होतो, अशी माहिती माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांनी पोलिसांना दिली.

पुणे : राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji sawant) यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पुणे पोलिसात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी मोठी धावाधाव करत या घटनेचा तपास केला. त्यावेळी, आमदारपुत्र ऋषीराज सावंत हे बँकॉकला चालले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, आमदार तानाजी सावंत हेही पोलीस आयुक्तालयात पोहोचले होते. अखेर, तानाजी सावंतांनी आपलं वजन वापरुन बँकॉकला निघालेलं ऋषीराज सावंत यांचं चार्टर प्लेन चेन्नईतूनच पुण्याकडे वळवलं. विशेष म्हणजे मुलालाही या गोष्टीचा थांगपत्ता लागला नसून विमान पुणे विमानतळावर उतरल्यावर त्याला या गोष्टीचा उलगडा झाला. आता, ऋषीराज सावंत हे बँकॉकला नेमकं कशासाठी निघाले होते, याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. बिझनेस ट्रिपसाठी ऋषीराज आपल्या दोन मित्रांसमवेत बँकॉकला जात होते, अशी कबुली पोलिसासमोर देण्यात आली आहे. ऋषीराजसमवेत असलेल्या दोन्ही मित्रांचा जबाब पुणे (Pune) पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. 

बँकॉकला "बिझनेस ट्रिप"साठीच चाललो होतो, अशी माहिती माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांनी पोलिसांना दिली. पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीत ऋषीराज सावंत यांच्यासोबत असलेल्या इतर 2 जणांचे पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे. एका खासगी विमानाने 78 लाख 50 हजार रुपये देऊन ऋषीराज सावंत हे त्यांच्या 2 मित्रांना घेऊन बँकॉकच्या दिशेने निघाले होते. ऋषीराज यांनी त्यांच्या घरी बँकॉकबद्दल सांगितले आहे का नाही याबद्दल मित्र अनभिज्ञ होते. त्यातील एक मित्र सावंत यांच्या एका संस्थेत कार्यरत आहे, अशी माहितीही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. 

ऋषीकेश यांचे भाऊ गिरीराज सावंत यांनी काल घडलेल्या नाट्यमय प्रसंगाबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे. काल जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला हे कळत नव्हतं म्हणून वडिल तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यानंतरच, आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दिल्याचं गिरीराज यांनी सांगितलं. तर, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर मंत्रालयाकडून तातडीने सुत्रे हलली आणि सावंत यांचे चार्टर प्लेन चेन्नईतून माघारी फिरले. बंगालच्या उपसागरावर पोहचलेलं ऋषीराज सावंत यांच्या खासगी विमानाने हवेतूनच युटर्न घेतला. विमान जेव्हा लॅंड झालं तेव्हा ऋषिराज सावंत कळालं की, आपण बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो आहोत. 

सरकार सातत्याने सत्तेचा दुरुपयोग करतंय

तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. हे सरकार सातत्याने सत्तेचा दुरुपयोग करत आहे, हा गुंडाराज सरकारने पोसलेला आहे. त्याला संरक्षण देण्याचे काम मंत्रालयातून आणि डीजी ऑफिसमधून सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांना वरून आदेश दिले जातात, असे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच,  संतोष देशमुख प्रकरण असो वा परभणी प्रकरण असो. सत्ता पक्षाचे आमदार पोलिसांना माफ करा असं सांगत आहेत. पण, पोलीस आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करत आहे, असेही नानांनी म्हटले. 

हेही वाचा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Purandar Airport : एकरी 2 कोटी रुपये,  7 मे पासून पैसे खात्यात, MIDC मध्ये नोकरी, पुरंदर विमानतळासाठी पैशांचा पाऊस, सरकारचा मेगाप्लॅन
एकरी 2 कोटी रुपये,  7 मे पासून पैसे खात्यात, MIDC मध्ये नोकरी, पुरंदर विमानतळासाठी पैशांचा पाऊस, सरकारचा मेगाप्लॅन
Atul Save OSD Crime News: 'मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही'; अतुल सावेंच्या स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण अन् धमकी, पीडितेन सांगितली आपबिती
'मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही'; अतुल सावेंच्या स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण अन् धमकी, पीडितेन सांगितली आपबिती
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
Embed widget