एक्स्प्लोर

धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील भारतनगरमध्ये 12 वीतील विद्यार्थाने परीक्षेपूर्वी आदल्या रात्री टोकाचे पाऊलं उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सांगली : राज्यात आजपासून 12 वीची परीक्षा (Exam) सुरू झाली असून पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे. त्यातच, राज्य सरकारकडून परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे, कुठे परीक्षाचा उत्साह आहे, तर कुठे दडपणही पाहायला मिळत आहे. दरम्यान, सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 12 वीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवस अगोदरच आपलं जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरू केला आहे. 

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील भारतनगरमध्ये 12 वीतील विद्यार्थाने परीक्षेपूर्वी आदल्या रात्री टोकाचे पाऊलं उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या तणावातूनच प्रथमेश बाळासाहेब बिराजदार या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भारतनगर गवळी प्लॉट येथील प्रथमेश बिराजदार हा खासगी अकॅडमीत बारावी शिकत होता. काल, सोमवारी सायंकाळी परीक्षेत पेपर कसा सोडवायचा याचे अकॅडमीतून लेक्चर ऐकून तो रात्री आठ वाजता घरी परत आला. घरी आल्यानंतर बहिणीसोबत चेष्टा मस्करी करून तो अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला. मात्र, याच खोलीत त्याने अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्य, सोमवारी रात्री 9 वाजता प्रथमेशला जेवायला बोलवण्यास गेल्यानंतर त्याने खोलीत गळफास लावून टोकाचे पाऊल उचलल्याचे निदर्शनास आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. प्रथमेशचे वडील मिरजेत कृषी विभागात सहाय्यक आहेत. प्रथमेश हा अभ्यासातही चांगला होता. मात्र, त्याने आत्महत्या का केली, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. प्रथमेशने टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून याबाबत गांधी चौक पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

राज्यात 42 कॉपीची प्रकरणे उघडकीस

दरम्यान, राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 कॉपीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यावेळी बोर्डाकडून कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठीचे प्रयत्न केले जात असताना पहिल्या दिवशी 42 ठिकाणी गैरप्रकार समोर आल्याची घटना घडली. त्यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजी नगरमध्ये 26 गैरप्रकार समोर आले आहेत, तर मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. काही परीक्षा केंद्रावरली कॉपीचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. मात्र, प्रशासन व पोलिसांनी देखील कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. 

हेही वाचा

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Disha Salian Case & Aaditya Thackeray: शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवानABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 20 March 2025Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं NIA मार्फत चौकशी करण्याची मागणीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 20 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Disha Salian Case & Aaditya Thackeray: शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Astrology : आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
Embed widget