ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यभरात आजपासून 12 वीची परीक्षा, इंग्रजीचा पहिला पेपर कुठं उत्साहात, कुठं दडपणात; बुलढाण्यात शिक्षणमंत्र्यांनीच दिली परीक्षा केंद्रावर धडक; सरकारचं कॉपीमुक्त अभियान जोमात, पहिल्या दिवशी 42 केंदांवर कॉपीचा गैरप्रकार https://tinyurl.com/ycy7y3z7 बारावी परीक्षेत कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार, केंद्राची मान्यताही रद्द होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश https://tinyurl.com/474b6sph सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजूला सारुन परीक्षेला, बारावीचा आज पहिला पेपर दिला https://tinyurl.com/3y6scjkp
2. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय; जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी 438 कोटी, बारामती, दौंड आणि पुरंदरमधील शेतकऱ्यांना फायदा https://tinyurl.com/4ndtk54s मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच जिल्ह्यात जाण्याचे निर्देश https://tinyurl.com/52xc5an5
3. नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अण्णांचा आदेश, तानाजी सावंतांच्या लेकाच्या विमानाचा हवेतच यू टर्न, लँडिंगनंतर ऋषीराज सावंतला समजलं, बँकॉक नव्हे, आपण पुण्यातच पोहोचलो! https://tinyurl.com/m3mwrp33 ऋषीराज सावंत यांची 8 दिवसांपूर्वी दुबईवारी, आता 68 लाखांचं बिल, पप्पा रागावतील म्हणून न सांगताच घरातून गेले, तानाजी सावंतांच्या लेकाची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/444pw6cs
4. अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे संतापून म्हणाले, जाणीवपूर्वक आम्हाला बैठकीला बोलावलं नाही https://tinyurl.com/32yabv36 शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले, जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून आम्ही केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले https://tinyurl.com/8y55cxmd
5. एकनाथ शिंदेंसाठी कायपण, देवेंद्र फडणवीसांनी निर्णय फिरवला, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये उपमुख्यमंत्र्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री https://tinyurl.com/52dr3nu नाशिकमध्ये शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, आमदार सुहास कांदे माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर https://tinyurl.com/yceyypfe
6. हिमालयात संत महात्मा खूप, त्यांचा मला काय उपयोग असं म्हटल्यानंतर छनग भुजबळांवर भाजपचा पलटवार, तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलीय; अध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची भुजबळांवर बोचरी टीका https://tinyurl.com/mwk8xxr3 आरोप झाल्यावर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची, 'राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम'; अशोक चव्हाणांचं वक्तव्य https://tinyurl.com/583bnd4s
7. राज्यात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट, गेल्या 10 वर्षात अण्णा हजारेंनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही; संजय राऊतांनी डागली तोफ https://tinyurl.com/mr2uvrhx आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरे अन् संजय राऊतांवरही केला पलटवार, म्हणाले, ज्या रंगाचा चष्मा तसंच जग दिसतं https://tinyurl.com/4maww2k5
8. वसईत बहीण-भावाची 15 दिवसांपूर्वीच आत्महत्या, डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडताच वसई हादरली! https://tinyurl.com/5n9yrxc3 कठडा नसलेल्या विहिरीत कार कोसळली, 3 तरुणांचा बुडून मृत्यू, नागपूरमधील बुटीबोरीत खळबळ https://tinyurl.com/mmvz6jmw
9. लाडक्या बहिणींना 'दे धक्का'! अपात्र महिलांची नावे वगळण्यास सुरुवात, चारचाकीवाल्यांच्या घरी जाऊन सर्व्हे, पुण्यात 75 हजार 100 महिलांच्या घरी दिसली कार https://tinyurl.com/3mzr39sa मुलाचा सिबिल स्कोअर कमी आल्यानं अकोल्यात लग्नं मोडल्याचं प्रकरण, समोर आलं खरं कारण, 'ABP माझा'चा रिॲलिटी चेक https://tinyurl.com/yc82kh45
10. मुंबई पोलिसांचा समय रैनाला फोन, India's got Latent कार्यक्रमातील अश्लील वक्तव्यावरुन संयोजकांच्या अडचणी वाढल्या https://tinyurl.com/4ure9e23 प्रदर्शनापूर्वीच सिनेमाता 3 कट्स, 7 बदल अन् 161 मिनटं 50 सेकंदांचा सर्टिफाईड रनटाईम; 'छावा'वर सेन्सॉरची कात्री https://tinyurl.com/wwaftzz6
*एबीपी माझा स्पेशल*
अमिरेकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
https://tinyurl.com/3bmyp6tr
सिडकोकडून अंतिम यादी प्रकाशित, तुमचं नाव यादीत कसं शोधणार? सोडत कुठे आणि कधी? जाणून घ्या वेळ अन् ठिकाण
https://tinyurl.com/mw8dd5tk
'इंडियाज गॉट लेटेंट' शो नेमका आहे काय? अश्लील कंटेंटमुळे प्रसिद्ध असलेल्या शोमधून लाखोंची कमाई, कुठे पाहू शकता?
https://tinyurl.com/2fw8rt39
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*






















