एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : '50 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला, अशी ब्रेकींग 23 तारखेला लागली पाहिजे', विखे पाटलांच्या होमग्राउंडवर निलेश लंके गरजले

Nilesh Lanke on Radhakrishna Vikhe Patil : शिर्डी मतदारसंघात प्रभावती घोगरे 50 हजार मतांनी विजयी होणार आहेत. 50 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लागला, 23 तारखेला अशी ब्रेकींग लागली पाहिजे, असे लंकेंनी म्हटले.

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहे.  शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या (Shirdi Assembly Constituency) काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे (prabhavati Ghogare) या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दखल करण्यापूर्वी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या गावात महाविकास आघाडीकडून विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यातून खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. 
 
निलेश लंके म्हणाले की, स्वाभीमानीचा लढा लढू या. दहशतीला गाडूया, कायमचं गाडूया. गणेश सहकारी साखर कारखान्यातून याचा श्रीगणेशा झालाय. जगन्नाथाचा रथ अविरत पुढे चाललाय. त्या रथाच्या चालक प्रभावती घोगरे आहेत. विधीमंडळात ही वाघीण गरजणार आहे. गिधड की मौत आती है, तो वो शहर की तरफ भागता है. एक वर्षापासूनच जीभ घसरायला सुरू झाली. काही कार्यकर्ते मला भेटले, ते म्हणाले आम्ही विखेंचे कार्यकर्ते, पण आता त्यांची जिरवा. इतिहास बदलणारे आम्ही आहोत, जनतेन ठरवलं तर बदल घडतो, असे म्हणत त्यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. 

घाबरू नका, अभी नहीं तो कभी नहीं

धांदरफळात काय झालं? म्हणे आम्ही सुसंस्कृत आहोत. बाळासाहेब थोरात राज्यातील सुसंस्कृत नेते आहे. त्यांचे विचारच घाणरडे आहेत, कसला टायगर... कसला वाघ... मांजरीने वाघाचं झुल अंगावर पांघरल्याने तो वाघ होत नाही. घाबरू नका, अभी नहीं तो कभी नहीं. आम्हाला उलटे पाढे मोजता येतात. मात्र, आमच्यावर थोरात आणि पवार सांहेबांचे संस्कार आहेत, असे म्हणत निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. 

50 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला, अशी ब्रेकींग 23  तारखेला लागली पाहिजे

निलेश लंके पुढे म्हणाले की, पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देवू नये. 23 नंतर सत्ता आमचीच आहे. लोकसभा निवडणुकीत म्हणे यंत्रणा. कसली त्यांची यंत्रणा? त्यांचे कर्मचारी मला भेटायचे. लोक खवळले तर यंत्रणा चुलीत घालतात. आम्हाला हात जोडता येतात आणि बाह्या पण वर करता येतात. तिकडे नगरला हाताला शाही लावण्याचे काम झाले इकडे पण होणार आहे. बारकाईने सर्व लक्ष द्यावे लागेल, घाबरायचे नाही. भीती असती तर आंतरराष्ट्रीय डॉन मुख्यमंत्री झाले असते. मला इंग्रजी जरा कमी येते, पण मी इंग्रजीतून शपथ घेतली अन् ती गाजली. ही परिवर्तनाची निवडणूक आहे. मविआचे चिन्ह घराघरात पोहोचवा. शिर्डी मतदारसंघात प्रभावती घोगरे 50 हजार मतांनी विजयी होणार आहेत. 50 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लागला, 23 तारखेला अशी ब्रेकींग लागली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा

Maharashtra Assembly Elections 2024 : भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Sunil Shelke EXCLUSIVE : Rohit Pawar Jayant Patil लवकरच सत्तेत सहभागी होतील; शेळकेंचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 03 March 2025Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
Rohit Pawar : मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन
तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
Embed widget