एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार

Bhosari Assembly Constituency : अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत. यामुळे भाजपचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांची कोंडी होणार आहे. 

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) हे शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत. विलास लांडे यांच्या भूमिकेने भाजपचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांनी या मतदार संघामधून निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये हा मतदारसंघ भाजपने लढवला होता. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे आमदार महेश लांडगेंना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या मतदार संघावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी दावा ठोकला होता. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. 

विलास लांडेंनी भूमिका केली जाहीर

तर अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे हे देखील भोसरीतून निवडणुकीसाठी इच्छुक होते. विलास लांडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत. महायुतीत राहून ते मविआचे उमेदवार अजित गव्हाणेंचा प्रचार करण्याची भूमिका विलास लांडेंनी जाहीर केली आहे.  

महेश लांडगेंची कोंडी

त्यामुळं भाजपचे उमेदवार महेश लांडगेंची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. भोसरी बकाल झाली, भोसरी दहशतीखाली वावरते, असं म्हणत महायुतीत राहून लांडेंनी महायुतीचे उमेदवार लांडगेंना लक्ष केलं आहे. तर विलास लांडे माझ्यासोबत होते, आहेत, अन् पुढंही राहतील. हे मी सुरुवातीपासून सांगत आलोय. आज याची प्रचिती सर्वांना येतेय, असं म्हणत शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणेंनीही शड्डू ठोकला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आणखी वाचा

कुस्तीच्या मैदानात उतरण्याआधी वस्तादाचे पैलवानांना दोन सल्ले, युगेंद्र पवारांबद्दल बोलताना शरद पवार नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  20 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :20 डिसेंबर 2024 : ABP MajhaAlmatti Dam Special Report : अलमट्टीच्या धोक्याचा खरा अभ्यास कधी होणार?Rajkiya Sholey Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Embed widget