एक्स्प्लोर

Telly Masala : टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Ayushmann Khurrana T-20 World Cup : टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...

Ayushmann Khurrana T-20 World Cup :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खूपच चुरशीचा झाला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात करत अंतिम सामन्यात विजय मिळवला आणि  टी-20 विश्वचषकावर नाव कोरले. विश्वविजेत्या टीम इंडियावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) टीमला खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक खास कविता लिहिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Eknath Shinde : 'जोपर्यंत ते पद आहे तोपर्यंत तुम्हीच मुख्यमंत्री राहिलं पाहिजे ', महागुरु सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेंकडून एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं

Eknath Shinde : धर्मवीर सिनेमाच्या यशानंतर धर्मवीर -2 (Dharmaveer 2) सिनेमाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर रविवार 30 जून रोजी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. धर्मवीर-2 : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं या सिनेमाचं नाव आहे. तसेच येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सिनेमातील कलाकार आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी देखील उपस्थित होती. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar), महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यासह बॉबी देओल ही मंडळी उपस्थित होती. यावेळी सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं बरंच कौतुक केलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

Rajeshwari Kharat Relationship :  नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) पदार्पणातील 'फँड्री'  (Fandry) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. चित्रपटाचा आशय, दिग्दर्शन कौशल्य, कलाकारांचा अभिनय यामुळे 'फँड्री' चांगली कलाकृती झाली. त्याशिवाय, यात काम केलेल्या नवोदित कलाकारांनादेखील या चित्रपटाने ओळख दिली. या चित्रपटातील शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. राजेश्वरीच्या फोटोवरून ती रिलेशनशीपमध्ये आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Dharmaveer 2 : धर्मवीर-2 सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार, मंगेश देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली घोषणा 

Dharmaveer 2 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह कलाक्षेत्रातीलही अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ,सचिन पिळगांवकर,महेश कोठारे, बॉबी देओल यांच्यासह सिनेमातील कलाकार देखील उपस्थित होते. मंगेश देसाई (Mangeg Desai) या सिनेमाचे निर्माते असून या सोहळ्यात त्यांनी एक महत्त्वाची घोषण केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

OTT Release Week :  जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज

OTT Release Week :  सध्या मनोरंजनासाठी प्रेक्षकांचा ओढा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट, वेब सीरिज रिलीज करण्यात येत आहे. जून महिन्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, वेब सीरिज लाँच (OTT Release Weekend) होणार आहेत.  या आठवड्यात (1 July-7 July) ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर 3 सह इतर वेब सीरिज,  चित्रपट रिलीज होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget