एक्स्प्लोर

Singham Again Trailer : 'या' दिवशी रिलीज होणार 'सिंघम अगेन'चा ट्रेलर, त्या आधीच सोशल मीडियावर फेक VIDEO व्हायरल

Singham Again Trailer Release Date : सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर ग्रँड इव्हेंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे.

Singham Again Movie Release Date : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट यंदाच्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह स्टारर सिंघम अगेनचा ट्रेलर लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. बिग बजेट, तगडी स्टारकास्ट आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ॲक्शन पाहण्यासाठी प्रेक्षक फार आतुर झाले आहे. सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे.

सिंघम अगेन चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा

सिंघम अगेन चित्रपटाचं पोस्टर काही महिन्यांपूर्वी रिलीज करण्यात आलं होतं. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचा फर्स्ट लूक या आधीच शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी चाहते फार आतुर आहेत. अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांच्यासोबत ट्रेलरने खळबळ उडवून देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेनचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सर्व कलाकारांच्या उपस्थितीतच हा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

'या' दिवशी रिलीज होणार 'सिंघम अगेन'चा ट्रेलर

सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर ग्रँड इव्हेंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा नियमित ट्रेलर लॉन्च साधारण चित्रपटाच्या ट्रेलर लाँचप्रमाणे नसून भव्य असणार आहे. सिंघम अगेनचा ट्रेलर नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ग्रँड कार्यक्रमात लाँच होणार आहे. या ट्रेलर लाँचला 2000 जागा मीडिया ठेवण्यात येणार आहे. याशिवाय अजय देवगण, अक्षय  कुमार, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफच्या चाहत्यांनाही आमंत्रित केलं जाणार आहे. 

सोशल मीडियावर सिंघम अगेनचा ट्रेलर व्हायरल

सिंघन अगेन चित्रपटाप्रमाणेच लोक ट्रेलरचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात काही जणांनी फेक ट्रेलर बनवत ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यामुळे सिंघम अगेनच्या ट्रेलरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

यंदाच्या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर

सिंघम अगेन चित्रपट यंदाच्या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. त्यामुळेच त्याचा ट्रेलरही यंदाच्या वर्षातील मोस्ट अवेटेड ट्रेलर बनला आहे 2024 मधील हा सर्वात मोठा ट्रेलर लाँच कार्यक्रम असणार आहे. सिंघम अगेन ग्रँड स्केल चित्रपट आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या चित्रपटाचा ट्रेलर लाँचही भव्य असावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget