Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
या घटनेनंतर पुन्हा वाद पेटू नये यासाठी काळकुटे यांनी अज्ञात आरोपींना तत्काळ अटक करून घडलेली घटना स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे.

Beed: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा दुचाकीला धक्का लागला मात्र काही वेळातच सदर महिलेच्या घरात जाऊन अज्ञात तिघांनी धुडगूस घातला. एवढेच नाही तर महिलेला मारहाण देखील करण्यात आल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. (Beed) दरम्यान, ज्या वाहनाचा दुचाकीला धक्का लागला ते वाहन मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांचे आहे. ओबीसी महिलेच्या घरात घुसून धुडगूस घालणाऱ्या अज्ञात व्यक्तींना तत्काळ अटक करा अशी मागणी मराठा आंदोलक गंगाधर कळाकुटे यांची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. सध्या बीड जिल्ह्यात सामाजिक स्थिती बिकट झालीय. या घटनेनंतर पुन्हा वाद पेटू नये यासाठी काळकुटे यांनी अज्ञात आरोपींना तत्काळ अटक करून घडलेली घटना स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे.
नक्की प्रकरण काय ?
मस्साजोगला परवा जयंतीच्या कार्यक्रमासाठी चौसाळ्याच्या दिशेने जात असताना कचारवाडीच्या जवळ मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा एका महिलेच्या दुचाकीला कट बसला . ही गाडी मराठा आंदोलन गंगाधर काळकुटे यांच्या नावावर आहे .संतापलेल्या महिलेच्या मुलाने ताफ्यातील गाड्या अडवल्या .दुचाकीला धक्का लागल्यावरून महिलेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली .मात्र काही वेळातच सदर महिलेच्या घरात जाऊन अज्ञात तिघांनी धुडगूस घालत महिलेला मारहाण केल्याची घटना घडली .याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ज्या अज्ञातांनी महिलेला मारहाण केली त्या अज्ञातांना तात्काळ पकडून अटक करावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांनी केली आहे . या संदर्भातील निवेदनही त्यांनी पोलिसांना दिले आहे .या अज्ञातांना मराठा वंजारी वाद लावायचा होता का असा प्रश्न काळकुटे यांनी उपस्थित केला .मनोज जरांगेंच्या ताब्यात कोण्या अज्ञात आला गोंधळ करायचा होता का अशीही शंका काळकुटे यांनी उपस्थित केली .या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे .अज्ञातांना शिक्षा झाली पाहिजे असेही काळकुटे म्हणाले .महिलेच्या दुचाकीला ज्या वाहनाने कट बसला ते वाहन गंगाधर काळकुटे यांच्या नावावर आहे .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
