Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Salman Khan in Singham Again : रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगणसोबत सलमान खान म्हणजेच दबंग चुलबुल पांडेची एन्ट्री होणार आहे.
Chulbul Pandey in Singham Again : रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट असल्याने प्रेक्षकांच्या याकडे नजरा लागल्या आहेत. तगड्या स्टारकास्टमुळे सिंघम अगेन चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करीना कपूर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉप आणि विलनच्या भूमिकेत अर्जून कपूर झळकणार आहे. आता या स्टारकास्टमध्ये बॉलिवूडमधील आणखी एक नाव जोडलं गेलं आहे.
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार
रोहित शेट्टीच्या कॉप युनिवर्समध्ये दबंग चुलबुल पांडेची एन्ट्री होणार आहे. सिंघम अगेन चित्रपटात अभिनेता सलमान खान कॅमिओ करणार आहे. बॉलिवूडचा दबंग खान उर्फ चुलबुल पांडे रोहित शेट्टीच्या चित्रपटात धमाका करायला येणार आहे. अजय देवगणचा सिंघम चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या दिवाळी सिंघमसोबत डबल धमाका करण्यासाठी दबंग चुलबुल पांडेही येणार आहे.
रोहित शेट्टीच्या चित्रपटात सलमान खान
टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, सलमान खान इन्स्पेक्टर चुलबुल पांडेच्या भूमिकेत कॅमिओ करणार आहे. त्याच्या सलमान खान सिंघम फ्रेंचायझीमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रोहित शेट्टीने सलमान खानला त्याच्या ॲक्शन चित्रपटाचा भाग होण्यासाठी राजी केलं आहे.
View this post on Instagram
सलमान खानने सिंघम अगेन चित्रपटात कॅमिओ भूमिका साकारण्यासाठी होकार दिला आहे.
सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 ची बॉक्स ऑफिसवर टक्कर
सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे टाळण्यासाठी कार्तिक आर्यनने रोहित शेट्टीला फोन करून चित्रपट पुढे ढकलण्यास सांगितल्याची माहिती समोर येत आहे. सिंघम अगेन 1 नोव्हेंबर ऐवजी 15 नोव्हेंबरला रिलीज करू, असं कार्तिकनं म्हटलं होतं. याचा फायदा दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर झाला असता. पण, आता रोहित शेट्टी सिंघम अगेन चित्रपट पुढे ढकलण्याच्या विचारातमध्ये नसल्याचं दिसून येत आहे. सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :