एक्स्प्लोर

Pankaj Udhas : "आमच्या गझल क्षेत्राचं मोठं नुकसान झालं"; पंकज उधास यांच्या निधनानंतर ज्येष्ठ गजलगायक भीमराव पांचाळे भावूक

Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दीर्घ आजाराने त्यांनी प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ गजलगायक भीमराव पांचाळे (Bhimrao Panchale) शोक व्यक्त करत म्हणाले,"पंकज उधास यांचं जाणं हे गझलचं मोठं नुकसान आहे. अन्य गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे, त्यात असे मोहरे जाणं हे धक्कादायक आहे". 

ज्येष्ठ गजलगायक भीमराव पांचाळे  (Bhimrao Panchale) म्हणाले,"पंकज उधास यांचं जाणं हे गझलचं मोठं नुकसान आहे. आमच्या कमी भेटी झाल्या, पण त्या लक्षात राहणाऱ्या होत्या. खूप मोठा माणूस होता. अतिशय साधा आणि संवादी पद्धतीने गझल सादर करत होते. त्यांच्या गायकिची वेगळी पद्धत निर्माण झाली होती, ती अतिशय लोकप्रिय होती. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली". 

भीमराव पांचाळे पुढे म्हणाले,"गझल गायक क्षेत्रात खूप संख्या कमी आहे. अन्य गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे, त्यात असे मोहरे जाणं हे धक्कादायक आहे. आमच्या गझल क्षेत्राचं मोठं नुकसान आहे".

सुरेश वाडकर भावूक

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) म्हणाले,"पंकज उधास यांनी आपल्या गझलने समस्त दुनियेला आनंद दिला. ते आपल्यातून गेले, ही धक्कादायक बातमी आहे. पंकज उधास यांचं जाणं फारच वाईट झालं. त्यांच्या कुटुंबाबत विचार करुन माझ्या अंगावर काटा येतोय. त्यांची पत्नी, कन्या खूपच प्रेमळ मुलगी. पंकज उधास यांच्या 'खजाना' या अल्बमचं पुन्हा येणार होते. माझ्या शाळेत त्याच्या रिहर्सल्स सुरु होत्या. पंकज उधास उच्चशिक्षित होता, इतका मोठा गाणारा माणूस, चांगला मित्र आज आम्ही गमावला. त्यांच्या कुटुंबीयांना इतका मोठा धक्का पचवण्याची शक्ती इश्वर देवो, ही प्रार्थना".

पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांनी गायलेल्या 'नाम' या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. पंकज उधास (Pankaj Udhas) यांना गजलचा बादशहा म्हटले जाते. 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपर येथे त्यांचा जन्म झाला. गजलला महत्त्व मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अनेक गजल चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करुन जातात. आज त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पंकज उधास यांनी गायलेल्या गाण्यांची आणि गझलांची आजही संगीतप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 

संबंधित बातम्या

Pankaj Udhas Passed Away : गझल नि:शब्द झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Embed widget