Pankaj Tripathi : मी थकलोय...340 दिवस अभिनय करू शकत नाही; पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय
Pankaj Tripathi : अभ्यासू अभिनेते अशी ओळख असणाऱ्या पंकज त्रिपाठी यांनी आता निवडक प्रोजेक्ट निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
Pankaj Tripathi : अभ्यासू अभिनेते अशी पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची ओळख आहे. सिनेमा, वेबसीरिज अशा सर्वच माध्यमाची निकड सहजगत्या आत्मसात करणारे आघाडीचे अभिनेते पंकज यांनी आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण आता त्यांनी निवडक प्रोजेक्ट निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
पंकज त्रिपाठी यांना 'फुकरे 3' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान पीटीआय दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर भाष्य केलं आहे. पंकज म्हणाले,"जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त अन्नाचं सेवन करता. अगदी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कलाकृती या प्रेरणा देत असतात. आता मी जास्त प्रमाणात सिनेमा करणं थांबवलं आहे. मला वाटतं की, मी थकलोय. कोणत्या सिनेमासाठी कधी, कोणता शॉट दिला हे सांगणं अवघड जात आहे".
340 दिवस अभिनय करू शकत नाही : पंकज त्रिपाठी
पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले,"तुम्ही 340 दिवस अभिनय करू शकत नाही आणि मी हेच करत आहे. त्यामुळे आता मला काही निवडक कलाकृतींचाच विचार करावा लागेल. मला कथा आवडल्याने त्या कलाकृतींसाठी मी होकार देत गेलो..पण आता विचार करून कलाकृतींची निवड करायला हवी.
पंकज त्रिपाठी यांचा 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. सध्या त्यांचा 'फुकरे 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. 'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या माध्यमातून लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. मराठमोळ्या रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
View this post on Instagram
पंकज त्रिपाठी यांच्या 'फुकरे 3'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला (Fukrey 3 Box office Collection)
पंकज त्रिपाठी यांचा 'फुकरे 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.82 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 7.81 कोटी, तिसऱ्या दिवशी 11.67 कोटींची कमाई केली. तर चौथ्या दिवशी 15.25 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 43.55 कोटींचा गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या