एक्स्प्लोर

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींनी दिवंगत वडिलांना केला पुरस्कार समर्पित

पंकज त्रिपाठींनी दिवंगत वडिलांना पुरस्कार समर्पित केला. 'मिमी' चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaj Tripathi Dedicates His First National Award Win To Late Father : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Award) 2023 च्या विजेत्यांची घोषणा  काल करण्यात आली. यात अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांना पुरस्कार मिळाले आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते पंकज त्रिपाठी यांचाही यांचाही जलवा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2003' मध्ये पाहायला मिळाला. 'मिमी' चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, "दुर्दैवाने हा काळ माझ्यासाठी दु:खाचा काळ आहे. बाबूजी आजूबाजूला असते तर त्यांना माझ्यासाठी खूप आनंद झाला असता. जेव्हा मला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्काराचा मिळाल्याचं कळालं तेव्हा त्याचा खूप अभिमान आणि आनंद झाला होता. हा राष्ट्रीय पुरस्कार मी त्यांना आणि त्यांच्या आत्म्याला समर्पित करतो. आज मी जो काही आहे तो त्याच्यामुळेच आहे. माझ्याकडे सध्या शब्द नाहीत, पण मी आनंदी आहे."

पंकज त्रिपाठी सध्या गोपालगंज या त्यांच्या गावात आहेत. नुकतेच त्यांच्या वडिलांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले, त्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यासोबतच त्याने 'मिमी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खिताब जाहीर झाल्याबद्दल क्रृती सेननचे अभिनंदनही केले आहे. अनेक भाषांमधील चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. तसेच काही मराठी चित्रपटांनी देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. यात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने बाजी मारली. त्याला 'पुष्पा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला तर गंगूबाई काठियावाडी साठी आलिया भट्ट आणि मिमी या चित्रपटांसाठी क्रृती सेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

पंकज त्रिपाठींच्या 'ओएमजी 2'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला (Pankaj Tripathi OMG 2 Box Office Collection)

पंकज त्रिपाठी सध्या 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पंकज त्रिपाठीसह बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. भारतात आतापर्यंत या सिनेमाने 113.67 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 157 कोटींचा गल्ला जमवला आहे.  

पंकज त्रिपाठी यांच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) हा त्यांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच त्यांचा 'मिर्झापूर' सिनेमाच्या आगामी भागाचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातमी: 

Kangana Ranaut: राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याने कंगना नाराज; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget