एक्स्प्लोर

Shirala Vidhan Sabha constituency : शिराळ्यात भाजपच्या सत्यजीत देशमुखांनी गुलाल उधळला, विधानसभेचं चित्र स्पष्ट

Shirala Vidhan Sabha constituency : लोकसभा निवडणुकीवेळी शिराळा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालं होतं. विधानसभेला मात्र काट्याची लढत दिसून येतंय. 

Shirala Vidhan Sabha constituency : शिराळा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्येभाजपच्या सत्यजीत देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मानसिंग नाईक यांचा 22,689 मतांनी पराभव केला. भाजपचे सत्यजीत देशमुख यांना 1,30,738 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मानसिंग नाईक यांना 1,08,049 मतं मिळाली. 

जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघात यंदा राजकीय गणितं बदलली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजपचे सत्यजीत देशमुख अशी रंगतदार लढाई झाली. सम्राट महाडिक यांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आल्याने सत्यजीत देशमुखांना विजय सोपा झाला.  

2019 सालच्या निवडणुकीत काय झालं होतं? 

2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक विरुद्ध शिवाजीराव नाईक हे पारंपरिक विरोधक मैदानात होते. त्यावेळी सम्राट महाडिकांनी बंडखोरी केली होती. मानसिंगराव नाईक यांनी 1,01,933 मतं मिळवून विजयी गुलाल उधळला होता. तर विरोधी शिवाजीराव नाईक यांना 76,002 मतं मिळाली होती. तर अपक्ष म्हणून लढणाऱ्या सम्राट महाडिकांना 46 हजार मतं मिळाली होती. 

शिराळा विधानसभा मतदारसंघातील आजची स्थिती

महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मानसिंगराव नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर महायुतीकडून भाजपने सत्यजीत देशमुखांना उमेदवारी दिली. या ठिकाणी भाजपच्या सम्राट महाडिकांनी बंडखोरी करत अपत्र अर्ज भरला होता. पण त्यांची बंडखोरी रोखण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलं. त्यामुळे या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत झाली. सत्यजीत देशमुख हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुखांचे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा या परिसरात मोठा जनसंपर्क आहे.

सांगलीतील शिराळा हा मतदारसंघ लोकसभेसाठी हातकणंगलेमध्ये येतो. या ठिकाणी महाविकास आघाडीला 9 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. त्याचा फायदा आता विधानसभेलाही होईल अशी आशा महाविकास आघाडीला आहे. शिराळा मतदारसंघामध्ये एकूण 3,05,208 मतदार आहेत. त्यापैकी 1,55,376 पुरूष मतदार तर 1,49,829 स्त्री मतदार आहेत.  

शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील 48 गावांचा समावेश होतो. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची ताकद मोठी आहे. तसेच या ठिकाणी महाडिक गटाचीही ताकद लक्षणीय आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Beed Crime : बीड हत्येचं प्रकरण, कोण आहेत वाल्मीक कराड?Zero hour on Today Match : अश्विन भारताचा यशस्वी गोलंदाज, सहा कसोटी शतकांसह 3503 धावाZero hour Guest Center : अमित शाह 90 मिनिटांच्या भाषणात त्या 12 सेकंदात काय बोलले?Zero Hour on Chhagan Bhujbal : शांत होणार की पक्ष सोडणार? छगन भुजबळांसमोर पर्याय कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
Embed widget