एक्स्प्लोर

Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...

Sujay Vikhe Patil on Balasaheb Thorat : भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यासाठी सभा घेतली.

संगमनेर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराची आज सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात (Sangamner Vidhan Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यासाठी सभा घेतली. अमोल खताळ यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याशी होणार आहे. या सभेतून सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर जोरदार तोफ डागली. 

सुजय विखे म्हणाले की, आजचा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आजची गर्दी पाहिल्यानंतर 23 तारखेला संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणून वेळेवर सभा संपून मला बायकोला जेवायला घेऊन जायचं आहे. आम्हाला इथे मैदान मिळालं नाही. इथलं जाणता राजा मैदान चार दिवस काँग्रेसने बुक केलं, पण एकही सभा त्यांनी तिथे घेतली नाही. पण यांना माहित नाही, हम जहा खडे होते हे लाईन वहा से शुरू हो जाती है, असा टोला त्यांनी बाळासाहेब थोरातांना लगावला. 

तुमचा माज मोडल्याशिवाय राहणार नाही

जनसामान्यांचा जनसागर रस्त्यावर उतरला आहे. इथले आमदार रोज शिर्डीत सभा घेत होते. त्यांनी जिल्ह्यातला राज्यातला आणि देशातला प्रत्येक नेता सभेसाठी आणला. शरद पवार, प्रियांका गांधी या सगळ्यांना आणलं. मला विचार पडत होता हे इतके मोठे नेते का आणत आहे? संगमनेरमध्ये 40 वर्षात काही विकास केला नाही म्हणून ते नेत्यांना शिर्डीला विकास दाखवायला आणत होते. आमच्या मतदारसंघात सगळे साऊंड सिस्टिमपासून तर सभेला आलेले लोक संगमनेरमधून आले होते. मात्र, इथे आलेले सगळे संगमनेरचेच आहेत. यापुढे संगमनेरमध्ये दडपशाही चालणार नाही हा संकल्प संगमनेरकरांनी केला आहे. आमच्याकडे नारा दिला दहशत से आजादी, इथे जेवढे बसले त्यातील कोणीही सांगा मला कोणी घाबरता का? मग दहशतीपासून कोणाची आजादी यांना करायची आहे. चाळीस वर्षात ज्यांचं तुम्ही कंबरडे मोडले, ती जनता या निवडणुकीत तुमचा माज मोडल्याशिवाय राहणार नाही.  

सुजय विखेंचं थोरातांना आव्हान 

ते भाषणातून सांगतात धांदरफळ मधून मी पळून गेलो. वाघ जेव्हा दोन पावलं मागे जातो, तो मोठी झेप घेण्यासाठी आणि आजची झेप आहे. त्यादिवशी माझ्या केसाला जरी धक्का लागला असता तर काहीही घडलं असतं. मात्र, संगमनेरला वाचवण्यासाठी मी दुसऱ्या मार्गाने गेलो. तुम्ही पळण्याच्या काय गोष्टी करतात. बांगड्या हातात घालून धमक्या देतात. आज आलोय संगमनेरमध्ये रात्री 8:00 वाजेपर्यंत बसून राहतो, या कोणाला यायचं, असे थेट आव्हान सुजय विखेंनी थोरातांना दिले. 

आली रे आली...आता तुमची बारी आली 

सुजय विखे म्हणाले की, तळेगावच्या काँग्रेसच्या सभेला बाहेरून विद्यार्थी आणले होते. त्यांचे कर्मचारी तिथे येऊन बसले होते. या निवडणुकीत त्यांचाच कर्मचारी त्यांचे बिऱ्हाड बांधल्याशिवाय राहणार नाही. आमचा माणूस चुकला, आम्ही मान्य करतो. आमच्या व्यासपीठावर घटना घडली, आम्ही दिलगिरी व्यक्त केली. मात्र, आमच्या महिलांना मारहाण केली, गाड्या जाळल्या त्याची माफी तुम्ही मागितली का? संगमनेर बंद करण्यात ते नेहमीच पुढे असतात. ऑइल मिल बंद, पेपर मिल बंद, जिनिंग प्रेस बंद, निळवंडेच काम यांनीच बंद केलं, आता 23 तारखेला यांचंच काम बंद करायचं आहे. 20 तारखेला मतदान, 23 ला मतमोजणी आणि माझा वाढदिवस 24 तारखेला आहे. त्यादिवशी संध्याकाळी टायगर पुन्हा संगमनेरमध्ये वाढदिवस साजरा करायला येणार, असेही सुजय विखेंनी म्हटले. काल आमचा प्रचार करणाऱ्या एका मुलाला तुम्ही मारलं. काही कार्यकर्त्यांना पैशाचा आमिष देत आहे. आली रे आली आता तुमची बारी आली, असा इशारा देखील सुजय विखेंना बाळासाहेब थोरातांना दिलाय. 

आणखी वाचा 

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget