एक्स्प्लोर

Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar on Ram Shinde : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचार सभेतून शरद पवार यांनी राम शिंदेंवर तोफ डागली.

कर्जत : या तालुक्याला 10 वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती, त्यांनी 10 वर्ष काय दिवे लावले? ते इथे मोठा बंगला बांधत आहेत. ते म्हणतात आम्ही दुष्काळी, गरीब आहोत आणि बंगला बांधत आहेत. त्यांनी स्वतःचा विकास केला, तुमचा नाही, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर केला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते.  

शरद पवार म्हणाले की, 20 तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. राज्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. देशाचे पंतप्रधान मोदी जनतेला म्हणायचे की, मला 400 खासदार निवडून द्या. पण 300 खासदार असले तरी देशाचा कारभार चालतो. आम्हालाही आधी प्रश्न पडला की हे असा प्रचार का करत आहेत?. आम्हाला वाटलं होतं की यात काहीतरी डाव आहे. आम्ही शोध घेत होतो, तर त्यांच्याच एका नेत्याने जाहीर भाषणात सांगितले की, 400 खासदार आल्यावर आम्हाला देशाचं संविधान बदलायचे आहे. आम्ही दिल्लीत बसलो होतो. आम्ही ठरवलं की, कोणतेही किंमत मोजायची वेळ आली तरी संविधान बदलू द्यायचे नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 

शरद पवारांचा महायुतीवर निशाणा 

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंकेला तुम्ही निवडून दिलं. देशात  31 आमचे खासदार तुम्ही निवडून दिले आणि मोदींना काहीही करता आलं नाही. विधानसभा निवडणूक आली आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. या देशात महिलांना सुरक्षा देणं अधिक गरजेचं आहे. महायुतीच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात मागील 2 वर्षात  67 हजार 381 महिलांनी आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. तर 64  हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत, अशी आकडेवारी मांडत शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. मी शेतकऱ्यांना सांगतो की, शेतकऱ्यांच्या घरात दोन मुलं असतील तर एकानेच शेती करावी. दुसऱ्याने काहीतरी काम करावं. या महायुती सरकारच्या काळात 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असा आरोप देखील शरद पवारांनी केला. आत्महत्येमागचे कारण काय तर शेती परवडत नाही, असेही त्यांनी म्हटले. 

शरद पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल 

कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामाकडे रोहित पवारांचे लक्ष आहे. या तालुक्याला 10 वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती त्यांनी काय केलं 10 वर्ष? असे म्हणत शरद पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली.मी मागे चौंडीत आलो, तिथे एक टोलेजंग बंगला बांधण्यात आलाय. मी विचार केला की, हा भाग तर दुष्काळी भाग आहे, तर हा बंगला कुणाचा असा प्रश्न मला पडला, असं म्हणत शरद पवारांकडून राम शिंदे यांच्या चौंडीतील घरावरून टीका करण्यात आली. त्यांनी लोकांचा विकास केला नाही. स्वतःच्याच तुंबड्या भरल्यात. या मतदारसंघात विकास करायचा असेल तर या मतदारसंघात एमआयडीसी व्हायला हवी, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा 

 

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget