एक्स्प्लोर

''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''

उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व असून ठाकरे यांच्याकडेच पुन्हा मुख्यमंत्री पद येणार आहे, हे राज्य पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातात द्यायचे आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहटी बंडातील सेलिब्रिटी आमदार काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात काही दिवसांपूर्वी शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांनी जाहीर सभा घेत गद्दारांना गाडण्याचे आवाहन सांगोलाकरांना केलं होतं. आता, शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सांगोल्यात जाऊन अपेक्षेप्रमाणे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. येथील महविकास आघाडीचे उमेदवार फक्त दिपक साळुंखे आहेत, कारण सांगोल्याची जागाच शिवसेनेची आहे. येथील बोलबच्चन मी 50 वर्षापासून पाहिलेत, शहाजी बापू (Shahaji bapu patil) याला शिवसेना माहिती नाही. मनात आणलं तर मुंबईत आणि विधानसभेत येऊ देत नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी सांगोल्यातून शहाजी बापूंना टोला लगावला. तसेच, शहाजी बापू यांचे नाव खोके पाटील आहे, सांगोल्यात गद्दारीचा डाग आपल्याला 23 नोहेंबराला पुसायचाय, असे आवाहनही संजय राऊत यांनी सांगोलेकरांना केलंय. 

उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व असून ठाकरे यांच्याकडेच पुन्हा मुख्यमंत्री पद येणार आहे, हे राज्य पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातात द्यायचे आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं. रोजगाराचा प्रश्न बदलायचा असेल, यासाठी एमआयडीसी आणावी लागेल. मुंबईवर अदानी, फडणवीस, शाह यांच्यामुळे रोजगार गमवायची वेळ आली आहे. सगळे रोजगार गुजरातमध्ये जात आहेत, सगळा रोजगार गुजरा कडे गेल्याने आपल्याकडे भिंकेचा वरवंट आलाय. येथील मतदारसंघात डॉक्टर जॉनी आणि गणपतराव देशमुख यांचा नातू हे फडणवीसांची बी टीम म्हणून काम करत आहेत. गणपतराव देशमुख यांच्याबद्दल आदर, पण डॉक्टर भाजपची बी टीम आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी शेकाप उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्यावर केलाय. 

मला सांगोल्यात डोंगर... झाडी... दिसले, निसर्गरम्य कडा कपाऱ्या दिसल्या आणि हे गुवाहटीला डोंगर झाडी बघायाला गेले. तुम्हाला महाराष्ट्र दिसला नाही, 50 खोके दिसले. टोल नाक्यावर पैसे कुणाचे पकडले, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. शहाजीसारखे गद्दार... शहाजीचे नाव बदला... इतिहासाची बदनामी करतो. कुणीतरी कोर्टात जावा, आपल्या राजाच्या वडिलांचे नाव बदनाम करत आहेत. शहाजी हे नाव लावून फिरू नका, खोटे गुन्हे दाखल कराल तर गाडून टाका, असे म्हणत राऊत यांनी सांगोल्यातील सभेतून शहाजी बापूंवर जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यास मोदी दिल्लीतून जातील

आम्हाला भाई गिरी शिकवू नको, आमचा जन्म भाई गिरीत गेला आहे. शिवसेनेचा जन्मच रस्त्यावर झाला आहे. योगी आदित्यनाथ हे भगवी लुंगी लावून येतात, वार आलं तर लुंगी उडून जाईल. बटेंगे ते कटेंगे... हे महाराष्ट्रात होणार नाही. गुजरातमध्ये फटाके फोडायचे असतील तर फडणवीस यांना मतदान करावे लागेल, असेही राऊत यांनी म्हटले. मिंदे...आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, 10 वर्षे अयोद्धामधील खटल्यात मी जातोय, महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यास 3 महिन्यात मोदी दिल्लीतून जातील, असे भाकीतही संजय राऊत यांनी केले. तसेच, 23 नोहेंबरनंतर मोदी शाह यांची दुकानदारी चालणार नाही, मिंदे हिरवळीवर जाऊन बसतो, मोदी शहा लवकर भेट देत नाहीत. गुजरात आणि सुरतमधून राज्य चालणार नाही, आपले स्वराज्य महाराष्ट्रातूनच आपले राज्य चालणार असेही राऊत यांनी म्हटले.  

हेही वाचा

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार

Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget