Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणी
Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणी
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. प्रकाश आंबेडकरांनी आज आपला गड असलेल्या अकोला जिल्ह्यात सभा घेतल्यात. बाळापुर आणि अकोटमध्ये त्यांनी वंचितच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्यात. बाळापुर मतदारसंघातील वंचितचे उमेदवार सय्यद नातिकोद्दीन खतीब यांच्या जिल्हा परिषद मैदानावरील प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय. उद्धव ठाकरेंच्या साथीने राहून काँग्रेस हिंदू संघटन झालंय का?, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केलाय?. काँग्रेसने आपल्या धर्मनिरपेक्षतेचा त्याग केला का?. असाही प्रश्न आंबेडकरांनी काँग्रेसला केलाय.






















