Karan Johar : करण जौहरची हायकोर्टात धाव, 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या सिनेमाविरोधात याचिका
Karan Johar : बॉलीवूडचा दिग्दर्शक करण जौहर याने हायकोर्टात धाव घेतली असून त्याने एका सिनेमाविरोधात याचिका दाखल केली आहे.
![Karan Johar : करण जौहरची हायकोर्टात धाव, 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या सिनेमाविरोधात याचिका Karan Johar Moves Bombay High Court Over Alleged Unauthorized Use Of His Name In Film Shaadi Ke Director Karan Aur Johar entertainment Bollywood news Karan Johar : करण जौहरची हायकोर्टात धाव, 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या सिनेमाविरोधात याचिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/5a1495948d6739b9c6305747df6f2a721718207694187720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Karan Johar : बॉलीवूड दिग्दर्शक आणि अभिनेता करण जौहर (Karan Johar) हा त्याच्या सिनेमांमुळे कायमच चर्चेत असतो. आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांना करणणे लॉन्च केलं आहे. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन अशी अनेक मोठी नावं आहेत. त्यामुळे करणला बऱ्याचदा नेपोटीझम या आरोपाला देखील सामोरं जावं लागलं. पण सध्या करण स्वत:च्या नावासाठी उच्च न्यायालयात धावला आहे. एका सिनेमाविरोधात करणने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे.
करण जौहरने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. करणने 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या सिनेमाविरोधात याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या नावात आणि कथेत आपल्या नावाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करणने या याचिकेत केला आहे. दरम्यान 14 जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
तातडीने सुनावणी घेण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
त्यामुळे यावर तातडीने सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलं आहे. करण जोहर या ब्रँडचं आणि त्याच्यासोबत असलेल्या पुण्याईचा गैरवापर होत असल्याचाही दावा करण्यात आलाय. तसेच सिनेमाचे पोस्टर्स, ट्रेलर्स ब्रँड करण जोहरचं नुकसान आणि बदनामी करत असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान आता यावर उच्च न्यायालय सिनेमाच्या बाबतीत काय निर्णय घेणार आणि करण जौहर पुढे काय करणार हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे.
करण जोहरबद्दल जाणून घ्या... (Who is Karan Johar)
करण जोहर हा बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माता आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा करण जोहरने सांभाळली आहे. त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कल होना हो, कभी अलविदा ना कहना, दोस्ताना, डियर जिंदगी, अशा अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा करण जोहरने सांभळली आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)