एक्स्प्लोर

Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 

Amravati News : अमरावतीच्या मोर्शीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती: अमरावतीच्या (Amravati News) मोर्शीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. तर या संदर्भात भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.  

खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार राहुल पाटील विरुद्ध जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शासनाकडे अहवाल सादर केला होता. यात आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामकाज, गौण खनिजाच्या कामात अनियमितता केल्याची पाटील यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीवरुन राहुल पाटील यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय तहसीलदार राहुल पाटील यांची आता विभागीय चौकशीही होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

अमरावतीच्या मोर्शीचे तहसिलदार राहूल पाटील आपल्या पदावर कार्यरत असताना निवडणूक विषयक कामकाज करताना, नैसर्गीक आपत्ती, गौणखनिज उत्खनन-वाहतूक व शासनाच्या प्राधान्य क्रमातील विषयात अक्षम्य दिरंगाई केल्याचं राज्यपाल यांच्या आदेशात म्हटले आहे. तसेच कार्यालयीन शिस्त पाळत नसल्याचे, तसेच बेजबाबदार कारभारामुळे महसूल विभागाची व शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले असल्याने राहुल पाटील यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधिनतेने राहूल पाटील यांना निलंबित करणे आवश्यक असल्याचे ही त्यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आदेश अंमलात असेपर्यंत राहूल पाटील यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये. तसेच  निलंबनाच्या कालावधीत तहसिलदार राहूल पाटील यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा वा व्यापार करू नये. त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल. शिवाय निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील. असेही या शासन आदेशात म्हटले आहे. 

हे ही वाचा 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KKR vs RR Live Score IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला; कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय
KKR vs RR Live Update : राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला; कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय
Jalna: अवैध वाळू उत्खननचा कहर! गोदावरी नदी पात्र पोखरलं; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
अवैध वाळू उत्खननचा कहर! गोदावरी नदी पात्र पोखरलं; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
Chhota Varkari : 'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Embed widget