एक्स्प्लोर

Share Market : 1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   

Xpro India Share : एक्सप्रो इंडिया शेअरनं गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांमध्ये दमदार रिटर्न्स दिले आहेत. शेअरनं पाच वर्षात 7400 टक्के परतावा दिला आहे. 

मुंबई : शेअर बाजारात घसरणीचं सत्र असताना बिर्ला ग्रुपच्या एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु आहे. एक्सप्रो इंडियाचा शेअर 9 टक्क्यांनी वाढून 1248.80 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. एक्सप्रो इंडियाचा शेअर गेल्या पाच वर्षात 7400 टक्के वाढला आहे. एक्सप्रो इंडिया शेअर 16 रुपयांपासून 1200 रुपयांच्या पुढं पोहोचला आहे. एकस्प्रो इंडियाचा शेअर गेल्या 52 आठवड्यांमध्ये उच्चांकी पातळीवर 1675.55 रुपयांवर होता तर या कालावधीतील निचांकी पातळी 867.10 रुपये होता. 

1 लाखांचे बनले 75 लाख रुपये

एक्स्प्रो इंडिया कंपनीचा शेअर 14 फेब्रुवारी 2020 ला 16.63 रुपये होता. एक्सप्रो इंडिया कंपनीचा शेअर आज (12 फेब्रुवारी) ला 1248.80 रुपयांवर आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षात या शेअरनं 7400 टक्के वाढला आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे 14 फेब्रुवारी 2020 ला एक्सप्रो इंडिया कंपनीचे  1 लाख रुपयांचे शेअर असतील. संबंधित व्यक्तीनं त्याची ती गुंतवणूक कायम ठेवली असेल तर आतापर्यंत  त्या 1 लाख रुपयांचे 75 .09 लाख रुपये झाले असते. यामध्ये कंपनीकडून देण्यात आलेल्या बोनस शेअरच्या मूल्याचा समावेश नाही. 

कंपनीनं वाटले बोनस शेअर

एक्सप्रो इंडियानं त्यांच्या भागधारकांना बोनस शेअर दिले आहेत.  1 जुलै 2022 ला कंपनीनं  दोन शेअर मागं एक शेअर असं शेअरचं वाटप केलं होतं. गेल्या चार  वर्षात एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये 3360 टक्क्यांची वाढ झाली आहे. 12 फेब्रुवारीला 2021 ला या कंपनीचा शेअर 35.97 रुपयांवर होता. तर, 12 फेब्रुवारीला  शेअर 1248.80 रुपयांवर आहे. गेल्या दोन वर्षात एक्सप्रो इंडियाचा शेअर 120 टक्क्यांनी वाढला आहे. 

शेअर बाजार सावरला 

भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांमध्ये घसरणीचा ट्रेंड सुरु होता. दोन्ही दिवसात शेअर एक हजार अंकांनी घसरला होता. निफ्टी 50  90 अंकांनी, बँक निफ्टी 90 आणि  सेन्सेक्स 325.91 अंकांनी घसरुन ट्रेड करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं आयातीवर टॅरिफ लादण्याचं धोरण, विदेशी गुंतवणूकदारांकडून केली जाणारी विक्री, रुपया कमजोर होणं या सर्वांचा परिणाम झाल्यानं शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत होतं. आज सेन्सेक्स अन् निफ्टी सावरला आहे. 

इतर बातम्या :

Gold Rate : गुड न्यूज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 1500 रुपयांनी घसरलं, चांदीचे दर घटले, गुंतवणूकदारांचा मोठा निर्णय

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
Embed widget