एक्स्प्लोर

Ind vs Eng 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे.

India vs England 3rd ODI : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही.

या मालिकेनंतर भारतीय संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होईल. पण त्याआधीच जसप्रीत बुमराहला संघातून वगळण्यात आले आहे. आता वरुण चक्रवर्तीच्या पायात समस्या आहे. वरुणची समस्या किती गंभीर आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही. बुधवारी अहमदाबादमध्ये नाणेफेक झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, वरुणच्या पायाला त्रास आहे. तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता.  

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील प्रभावी कामगिरीनंतर वरुण चक्रवर्तीला बक्षीस मिळाले आणि यशस्वी जैस्वालच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. पण, या मेगा स्पर्धेपूर्वी त्याच्या दुखापतीच्या बातमीने भारतीय चाहते थोडे चिंतेत आहेत. आधीच, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025  मधून आधीच बाहेर पडला आहे.

अहमदाबाद वनडेसाठी भारताने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी दिली आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. शमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा देखील एक भाग आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही खेळताना दिसेल. वॉशिंग्टन सुंदरलाही संधी मिळाली आहे. टीम इंडियाने रवींद्र जडेजाला ब्रेक दिला आहे.

वरुणचा आतापर्यंतचा रेकॉर्ड 

वरुण चक्रवर्तीने कटकमध्ये भारतासाठी एकदिवसीय पदार्पण केले. या सामन्यात त्याने एक विकेट घेतली. वरुणने टीम इंडियासाठी 18 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 33 विकेट्स घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे टी-20 सामन्यात 17 धावांत 5 बळी घेणे. वरुण चक्रवर्तीचा देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगला रेकॉर्ड आहे.

हे ही वाचा -

Champions Trophy 2025 : भारत, ऑस्ट्रेलियापासून द. अफ्रिकेपर्यंत...; आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे 5 वेगवान गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

Rishabh Pant: मोठी बातमी: ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण विष प्यायला, प्रेयसीचा मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय, अख्ख्या गावाचं होत्याचं नव्हतं झालं! 300 कोटी लिटर पाऊस, ढगफुटी होते तरी कशी? हिमालयीन पर्वत का कोसळतात??
Video: फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय, अख्ख्या गावाचं होत्याचं नव्हतं झालं! 300 कोटी लिटर पाऊस, ढगफुटी होते तरी कशी? हिमालयीन पर्वत का कोसळतात??
Mumbai High court Judge Aarti Sathe: आरती साठेंच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीवरुन राजकारण तापलं, वडेट्टीवार म्हणाले, 'राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल'
'राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल'; आरती साठेंच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीवरुन राजकारण तापलं
Dadar Kabutar khana: सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमले, कबुतरखान्यांवरील कारवाईला फडणवीसांनी स्थगिती दिल्याने विरोधकांचं टीकास्त्र
सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमले, कबुतरखान्यांवरील कारवाईला फडणवीसांनी स्थगिती दिल्याने विरोधकांचं टीकास्त्र
Tukaram Mundhe : मोठी बातमी! धडाडीचे IAS तुकाराम मुंढेंची बदली, 'या' महत्त्वाच्या खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम
मोठी बातमी! धडाडीचे IAS तुकाराम मुंढेंची बदली, 'या' महत्त्वाच्या खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय, अख्ख्या गावाचं होत्याचं नव्हतं झालं! 300 कोटी लिटर पाऊस, ढगफुटी होते तरी कशी? हिमालयीन पर्वत का कोसळतात??
Video: फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय, अख्ख्या गावाचं होत्याचं नव्हतं झालं! 300 कोटी लिटर पाऊस, ढगफुटी होते तरी कशी? हिमालयीन पर्वत का कोसळतात??
Mumbai High court Judge Aarti Sathe: आरती साठेंच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीवरुन राजकारण तापलं, वडेट्टीवार म्हणाले, 'राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल'
'राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल'; आरती साठेंच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीवरुन राजकारण तापलं
Dadar Kabutar khana: सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमले, कबुतरखान्यांवरील कारवाईला फडणवीसांनी स्थगिती दिल्याने विरोधकांचं टीकास्त्र
सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमले, कबुतरखान्यांवरील कारवाईला फडणवीसांनी स्थगिती दिल्याने विरोधकांचं टीकास्त्र
Tukaram Mundhe : मोठी बातमी! धडाडीचे IAS तुकाराम मुंढेंची बदली, 'या' महत्त्वाच्या खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम
मोठी बातमी! धडाडीचे IAS तुकाराम मुंढेंची बदली, 'या' महत्त्वाच्या खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम
पुण्यात 2 वर्षांपासून वीजचोरी, रिमोट कंट्रोलने 77,170 युनिट चोरले;  MSEB ने अखेर पकडला, 19 लाखांचा दंड
पुण्यात 2 वर्षांपासून वीजचोरी, रिमोट कंट्रोलने 77,170 युनिट चोरले; MSEB ने अखेर पकडला, 19 लाखांचा दंड
Maharashtra Live Blog: उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर, इंडिया आघाडीची बैठकीलाहि उपस्थिती
Maharashtra Live Blog: उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर, इंडिया आघाडीची बैठकीलाहि उपस्थिती
पैलवान चंद्रहार पाटलांचा एक व्हिडिओ पाहिला अन् मी नादच सोडला; उदय सामंतांनी सांगितला मजेशीर किस्सा
पैलवान चंद्रहार पाटलांचा एक व्हिडिओ पाहिला अन् मी नादच सोडला; उदय सामंतांनी सांगितला मजेशीर किस्सा
Multibagger Stock : एका वर्षात 1 लाखांचे 1 कोटी 93 लाख बनले, 'या' स्टॉकला दररोज अप्पर सर्किट, कंपनी काय करते?
1 रुपयांचा स्टॉक पोहोचला 224 रुपयांवर, वर्षभरात 15000 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल
Embed widget