Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Samay Raina : यूट्यूबर समय रैना आणि त्याचा 'इंडियाज गॉट लेटेन्ट' हा शो वादाच्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Samay Raina : यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) पालकांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर यूट्यूबर समय रैना (Samay Raina) आणि त्याचा 'इंडियाज गॉट लेटेन्ट' हा शो वादाच्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मात्र, हा 'इंडियाज गॉट लेटेन्ट' हा शो होस्ट करणाऱ्या समय रैनाचे इन्स्टाग्रामवर तब्बल 60 लाख फॉलोअर्स आहेत. मात्र, तो केवळ एकाच व्यक्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. जाणून घेऊयात'ती' व्यक्ती नेमकी कोण?
समय रैना हा एक लोकप्रिय भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि युट्यूबर आहे. तो 27 वर्षांचा असून मूळचा जम्मूचा आहे. कॉमेडी व्यक्तिरिक्त समय रैना बुद्धिबळ देखील खेळतो. कोरोना काळात युट्यूबवर त्याने मोठ्या बुद्धिबळपटूंबरोबर खेळाच्या लाइव्ह स्ट्रीमिंग केल्या होत्या. कोरोना काळात समय रैना चांगलाच चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले होते. 2019 साली ‘अॅमेझोन प्राइम व्हिडीओ’वरील लोकप्रिय कॉमेडी शो 'कॉमिकस्तान सीझन 2' हा शो समयने कॉमेडियन आकाश गुप्ताबरोबर जिंकला होता. त्यानंतर अनेक शोमधून समयने प्रेक्षकांना खळखळून हसवले. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला.
इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स
काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादिया परीक्षक म्हणून उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने आई-वडिलांसंबंधित एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर रणवीरवर टीकेची झोड उठल्याचे पाहायला मिळत आहे. आता ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व भाग युट्यूबवरून हटवण्याची आणि निर्मात्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
'ती' व्यक्ती नेमकी कोण?
दरम्यान, समयच्या युट्यूबवर 70 लाख सब्सक्रायबर्स असून इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स आहेत. तो केवळ एकाच व्यक्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. समय रैना इन्स्टाग्रामवर फॉलो करणारी 'ती' व्यक्ती राखी सावंत आहे. समयच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये शोमध्ये ही राखी सावंत परीक्षक म्हणून उपस्थित राहिली होती. राखी सावंतचा या भागाची देखील खूप चर्चा रंगली होती.
पोलीस अॅक्शन मोडवर
समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेन्ट या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी समय रैना, बलराज घाई तसेच अन्य काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इंडियाज गॉट लेटेन्टच्या ताज्या एपिसोडमधील वादग्रस्त भाग पाहून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एफआरआयनुसार एकूण 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
